भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचे संकट वाढणार; UNचा इशारा

Monday To Monday NewsNetwork।

नविदिल्ली(वृत्तसंस्था)।कोरोनामुळे कोट्यावधी लोकांचे नुकसान झाले आहे हे सगळ्यांच माहित आहे. काही दिवसांपूर्वी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील १ कोटींहून अधिक लोकं बेरोजगार झाल्याची माहिती दिली होती. आता संयुक्त राष्ट्र संघाने कोरोनामुळे जगभरातील बेरोजगारीचे संकट आणखीन वाढणार असा इशारा दिला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने कोरोनामुळे जागतिक स्तरावर ‘बेरोजगारीच्या समस्ये’चा उल्लेख केला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बुधवारी एक अहवाल सादर केला. ज्यामध्ये कोरोनामुळे रोजगारावर झालेल्या परिणामाचा तपशीलवार देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र संघ म्हणाले की, रोजगार आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्व देश मागे पडले आहेत.

या अहवालामध्ये काय म्हटले आहे?
पुढील वर्षी देखील असाच परिणाम होईल आणि २० कोटी लोकं बेरोजगार होण्याची शक्यता आहे. आता १०.८ कोटी कामगार गरीब आणि अत्यंत गरीब या कॅटेगरीमध्ये आले आहेत. World Employment and Social Outlook: Trends 2021 report या १६४ पानाच्या अहवालात संयुक्त राष्ट्रच्या कामगार संघटनेच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हटले की, ‘कोरोनामुळे रोजगार बाजारावर असर पडला आहे. धोरणात्मक प्रयत्नांची पूर्तता न झाल्याने महामारीमुळे अभूतपूर्व विनाश केला आहे. याचा परिणाम बऱ्याच वर्षांपर्यंत राहिल. २०२०मध्ये एकूण कामकाजाच्या वेळेमध्ये नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले, जो ८.८ टक्के आहे. ही वेळ २५.५ कोटी पूर्णवेळ कामगारांच्या एका वर्षासाठी काम करण्याइतकीच आहे.’

जागतिक कोरोना संकटामुळे जगभरात बेरोजगाराची समस्या २०२१मध्ये ७.५ कोटीपर्यंत पोहोचले आणि २०२२मध्ये २.३ कोटी होईल. रोजगार आणि कामकाज वेळेत कमी झाल्यामुळे बेरोजगारीचे संकट आणखीन गडद होत जाईल. महामारीचे संकट आले नसते तर ३० कोटी नवीन रोजगार २०२०मध्ये उपलब्ध झाले असते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!