देवा रे देवा! ब्लॅक, व्हाइट, येलो आता क्रिम; बुरशीची अनेक रूपं ,कोरोना नंतर बुरशीचं थैमान
Monday To Monday NewsNetwork।
नवीदिल्ली(वृत्तसंस्था)।कोरोना महासाथीच्या लाटा, कोरोनाव्हायरसची वेगवेगळी रूपं आणि आता नवनव्या फंगसचंही थैमान. कोरोनाच्या संकटात फंगसचं नवं संकटही ओढावलं आहे. ज्याप्रमाणे कोरोनाची वेगवेगळी रूपं समोर आली, तशी आता फंगसचीही वेगवेगळी रूपं समोर येत आहेत. ब्लॅक , व्हाइट , येलो,फंगसनंतर आता क्रिम फंगसही दिसून आलं आहे. मध्यप्रदेश मध्ये क्रिम फंगसचा रुग्ण आढळला आहे. मध्य प्रदेशच्या जबलपरूमध्ये एका रुग्णाला ब्लॅक फंगससह क्रिम फंगसचं इन्फेक्शन झालं आहे. माहितीनुसार राज्यातील हे असं पहिलं प्रकरण आहे. सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजच्या ईएनटी विभागात या रुग्णावर उपचार सुरू आहेत.
बुरशी म्हणजे परजीवी वनस्पतीचे छोटे छोटे रोपटं. ते क्लोरोफिल होत नाही, त्यामुळे ते गोठतात किंवा विकसित होतात. मात्र त्यांनी मानवी शरीरात प्रवेश केल्यास ते गंभीर नुकसान करतात. जगभरात विविध प्रकारचे फंगस आढळतात. ते आपल्या शरीरात शिरून नुकसान करू शकतात. इम्युनिटीदेखील कमजोर करतात. काही फंगस तर इतके गंभीर आजारी करू शकतात की त्यावर उपचार होणंही कठीण असतं.प्रामुख्याने हवा, पाणी, हवेतील प्रदूषण, माती, भाजी, खतं, रोपं आणि फळं हे बुरशीचे सुवाहक आहेत. या माध्यमातून बुरशी आपल्या मानवी शरीरात प्रवेश करते. असं म्हणतात, म्युकोरमायकोसिस ही बुरशी आपल्या नाकात आणि घशात कायम असते. मात्र ती शरीराच्या आत गेली आणि पसरली तर जीवघेणी ठरू शकते. ही बुरशी आपल्या शरीरातील अनेक अवयवांचे कायमस्वरुपी नुकसान करू शकते.