भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयसामाजिक

देशात लवकरच समान नागरी कायदा लागणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे स्पष्ट संकेत

नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशात लवकरच समान नागरी कायदा (कॉमन सिव्हिल कोड) लागू होईल, अशी शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तसे स्पष्ट संकेत दिले.

भोपाळमध्ये भाजप नेत्यांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की, सीएए, राम मंदिर कलम ३७० आणि ट्रिपल तलाक यांसारख्या मुद्द्यांवर निर्णय झालाय. आता समान नागरी कायद्याची वेळ आलीय. दरम्यान, पक्ष कार्यालयात कोअर कमिटी आणि प्रमुख नेत्यांसोबत अनौपचारिक बैठकीत शहांनी सांगितलं की, उत्तराखंडमध्ये हे पथदर्शी कार्यक्रमांतर्गत लागू केलं जात आहे. मसुदा तयार केला जात आहे. शिल्लक राहिलेलं काम योग्य पद्धतीनं पूर्ण केलं जाईल. मात्र, तुम्ही लोकांनी पक्षाला नुकसान होईल, असं कोणतंही काम करु नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

तत्पूर्वी शहांनी देशात सर्व काही ठीक झालं? असा प्रश्न राज्यातील वरिष्ठ नेत्यांना विचारला. यानंतर, त्यांनी कॉमन सिव्हिल कोड मुद्द्यावर चर्चा केली. एवढंच नाही, तर पुढील निवडणुकीपूर्वी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होतील. पण, काळजी करण्याचं काही कारण नाही, काँग्रेसची आणखी दयनीय अवस्था होणार आहे. कसलंही आव्हान नाही, असंही शाह म्हणाले. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!