आरोग्यमहाराष्ट्र

शरद पवारांसोबत बैठकीत उपस्तीत असलेले राष्ट्रवादीच्या त्या मंत्र्यास कोरोनाची लागण !

सातारा (वृत्तसंस्था)। कोरोनाचा सर्वत्र कहर सुरू आहे त्यातून सेलिब्रिटींपासून ते अन्य राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे सहकार मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थितीत होते.

कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे या परिस्थितीत सगळ्या यंत्रणेवर लक्ष ठेऊन यातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बाळासाहेब पाटील यांना कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरू करण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे,  काही दिवसांपूर्वी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी या बैठकीला बाळासाहेब पाटील सुद्धा हजर होते. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी, शासकीय अधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. पाटील यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्यात आली आहे. तसंच जर कुणी संपर्कात आले असेल, त्यांनी क्वारंटाइन व्हावे किंवा समोर येऊन माहिती द्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!