निंभोरा – खिर्डी रस्त्याची अत्यंत दुरावस्था, चिखल युक्त पाणी अंगावर उडाल्यामुळे शाब्दिक चकमकी
निंभोरा बु: ता: रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |
येथील एसटी स्टँड पासून ते उड्डाणपुलापर्यंत असलेल्या एक किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून मोठमोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून नागरिकांना अनेक दिवसापासून अडचणीला सामोरे जावे लागत आहे या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली असून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे असा वाहनधारकांनडून संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान या जीव घेण्यासाठी छोट्या मोठ्या दुर्घटना होतच असतात मात्र प्रशासन मोठी दुर्घटना वित्तहानी झाल्याची वाट बघत आहे का ?..असा उलट पक्षी सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पंचक्रोशीतील शेतशिवारात व गावांकडे जाणारा हा प्रमुख रस्ता असून या रस्त्यावर नेहमी केळी वाहतूकदार ट्रक, ट्रॅक्टर यांची प्रचंड वर्दळ असते अनेक दिवसापासून या खड्ड्यांची कोणतीही दुरुस्ती किंवा खड्डे बुजवण्यात आलेले नाही. पावसाचे पाणी भरल्यानंतर खड्ड्याचा अंदाज वाहन चालकाला येत नाही व त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पादचारी, शालेय विद्यार्थी महिला, वृद्ध व मुलांच्या अंगावर चिखल युक्त पाणी उडाल्यामुळे शाब्दिक चकमकी व भांडण तंटे नेहमी होत असतात तरी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिल्यास व जबाबदारीची दखल घेतल्यास हा प्रश्न सुटू शकतो. या रस्त्याची दुरुस्ती व डागडुजी करणे किमान अपेक्षित असून रस्त्यावरून इजा करणाऱ्या वाहनधारकांचा व केळी वाहतुकीचा या प्रमुख मार्गाचा संबंधित प्रशासनाने दखल घेऊन हे काम मार्गी लावावे अशी मागणी नागरिकात मधून होत आहे

