निंभोरा युवकांची ग्राम पंचायतीवर धडक,ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून तारीख रुपी आश्वासन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
निंभोरा बु ता.रावेर.(प्रतिनिधी)। निंभोरा बु गावातील वार्ड क्र ६ पोलीस स्टेशन मागील वसाहतीतील सांडपाण्याच्या प्रवाहाचा प्रश्न सुटत नसल्यामुळे वसाहती मध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन तेथील रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्या संदर्भात तेथील युवक रहिवाशी ग्राम पंचायत मध्ये गेले असता ग्राम विकास अधिकारी यांच्या जवळ आपली कैफियत मांडत काही युवक संतप्त होऊन म्हणाले की “भाऊसाहेब जेव्हा पासुन आम्हाला समजते तेव्हा पासुन हा सांड पाण्याचा प्रवाह मार्गी लावण्यासाठी आजपर्यंत कोणतेही ठोस काम झालेले नाही वारंवार अर्ज देऊन,तोंडी सांगुन देखील काम झालेले नाही.आता वारंवार अर्ज देऊन आमच्या सहन शक्तीचा अंत झाला असुन हे आम्ही शेवटचे निवेदन देत आहोत तरी या निवेदनावर लवकरात लवकर निर्णय घेणे आपण लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही आंदोलन करू व होणाऱ्या आंदोलनास ग्राम पंचायत जबाबदार राहील” असा इशारा या वेळी युवकां कडुन देण्यात आला.तसेच गटारींचे बांधकाम व सांडपाण्याचा प्रवाहाच्या कामाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होईल याची माहिती मागितली असता ग्रा वि अ यांनी २०/०७/ २०२१ ह्या तारखेचे आश्वासन दिले.