भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

मधमाशांचा हल्ला, एकाच कुटुंबातील ९ जण जखमी

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील नवस फेडण्यासाठी आलेल्या कुटुंबावर मधमाशांनी हल्ला केला त्यात कुटुंबातील नऊ जण जखमी झाले आहेत.

यावल तालुक्यातील किनगाव या गावाकडून डांभुर्णी जाणाऱ्या रस्त्यावर पाच पीर बाबा यांची दरगाह आहे. या दरगाहवर रविवारी तडवी कुटुंबीयांकडून नवस फेडण्यासाठी स्वयंपाक केला जात होता. दरम्यान त्याच वेळी या तडवी कुटुंबावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात ९ जण जखमी झाले आहे.  या नऊ जणांपैकी तिघांना मधमाशांनी गंभीर चावा घेतला आहे.जखमींना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

किनगाव ता. यावल या गावातून डांभुर्णी कडे जाणारा रस्त्यावर पाच पीर बाबा यांची दरगाह आहे. या दरगाहावर रविवारी किनगाव गावातील तडवी कुटुंब नवस फेडण्यासाठी गोड भातचा स्वयंपाक करत होते. दरम्यान त्याच वेळी मधमाशांनी या कुटुंबावर हल्ला केला. यामध्ये फरीदा जावेद तडवी, नर्गीस रफीक तडवी, जावेद रशीद तडवी, अर्श जावेद तडवी, हमिदा रफिक तडवी, रफिक मुबारक तडवी, अंजुम रुस्तुम तडवी, जोया रुस्तम तडवी, जिशान रफिक तडवी हे नऊ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय पथकाने उपचार केले .दरम्यान या नऊ जणांपैकी तिघांना मधमाशांनी जबर चावा घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!