अमळनेरएरंडोलचाळीसगावचोपडाजळगावजामनेरधरणगावपाचोरापारोळाबोदवळभुसावळमुक्ताईनगरयावलराजकीयरावेर

खडसे, महाजन, सावकारे, गुलाबरावांचा गड मजबूत, शिरीष चौधरी, चंद्रकांत पाटलांसाठी धोक्याची घंटा ; जळगावात भाजपच वरचढ?

News Arena India Survey : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अशात ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या संस्थेने महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बलाबल असेल याचा अंदाज सर्व्हेतून सांगितला आहे. या संस्थेने जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात केलेल्या सर्व्हेत दिग्गज नेतेमंडळी त्यांचे गड शाबूत राखताना दिसत आहेत.

जळगाव शहर व जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असू शकते याचा अंदाज सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे. न्यूज एरिना इंडिया (News Arena India Survey) या संस्थेने हा सर्व्हे केला आहे. याच संस्थेने कर्नाटकातील निवडणुकांचाही सर्व्हे केला होता. या सर्व्हेत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. निकालही तसेच आले. त्यानंतर या संस्थेने महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे जाहीर केला आहे. या संस्थेने जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात केलेल्या सर्व्हेत भाजप जळगाव (Jalgaon) हा आपला बालेकिल्ला पुन्हा सर करताना दिसत आहे.

खडसे, महाजन, सावकारे, गुलाबरावांचे गड अभेद्यच

या सर्व्हेनुसार मुक्ताईनगर मतदासंघ एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ म्हणून बालेकिल्ला मानला जातो. मागील निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. एकनाथराव खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट दिले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा थोड्या मतांनी पराभव करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. 2024 च्या निवडणुकीत खडसे आपला गड राखण्यात यश येणार असल्याचा अंदाज सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे. आ. एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे त्यांचे तिकीट निश्चित आहे. तर दुसरीकडे आ. चंद्रकांत पाटील कडवट शिवसैनिक असून भाजपचे सहयोगी आमदार आहेत. मात्र, मुक्ताईनगर मतदासंघांची जागा आता पर्यंत भाजपला सुटलेली आहे त्यामुळे कदाचित ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकार सांगतात. अशा घडामोडी जरी घडल्या तरी यंदा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात जाताना सर्व्हेतून दिसत आहे.

जामनेर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटर्तीय तथा ग्रामविकामंत्री मंत्री गिरीश महाजन यांचा हा मतदासंघ असून मागील निवडणुकीत भाजपचे गिरीश महाजन या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे संजय गरुड यांचा पराभव केला होता. आताही पुन्हा ही जागा भाजपच्याच खात्यात जाणार असल्याचा दावा सर्व्हेत करण्यात आला आहे.

रावेर यावल मतदारसंघात सर्व्हेतून विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांना धक्का देणारा अंदाज असून मागिल निवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते हरिभाऊ जावळे व अनिल चौधरी यांनी जोरदार टक्कर दिली होती. मात्र काँग्रेसचे शिरिष चौधरी यांनी त्यांचा पराभव केला होता. अनिल चौधरी यांनी त्यावेळी अपक्ष उमेदवारी केली होती परंतु, आता हे प्रहार जनशक्ती पक्षात सामील झाले आहे. आगामी 2024 च्या निवडणुकीत आ. चौधरी साठी धोक्याची घंटा असून ही जागा भाजपच्या पारड्यात जाणार असल्याचा दावा या सर्व्हेत करण्यात आला आहे.

भुसावल मतदार संघात सद्या भाजपचे वर्चस्व आहे, तसेच आ. एकनाथराव खडसे यांचा प्रभाव मतदासंघात आहे. गेल्या निवडणुकीत आ. सावकारेच्या विजयासाठी खडसेंनी मोठी ताकद लावली होती. त्यामुळे खडसे आता राष्ट्रवादीत आहे. असे असले तरी भुसावल विधानसभा मतदार संघ भाजप पुन्हा राखणार असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे.

या सर्व्हेनुसार भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव ग्रामीणचे आ. राजुमामा भोळे जळगाव मतदारसंघातून पुन्हा बाजी मारतील असा अंदाज वर्तविला असून मागील 2019 च्या निवडणुकीत राजूमामा भोळे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. यंदाही हा मतदारसंघ भाजपच्या खात्यात जाताना दिसत आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांचे वजन आहे. मागील निवडणुकीत ते विजयी झाले होते. आगामी निवडणुकीतही ही जागा शिवसेनेकडेच राहिल असे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघापैकी भाजपला 6, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. पण प्रत्यक्षात हा सर्व्हे सत्यात उतरेल का? यासाठी अद्याप सव्वा वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काय निकाल लागेल यासाठी 2024 पर्यंत वाट पाहण्याची गरज आहे.

राज्यात भाजपला सर्वाधिक 125 जागा दाखवल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा मिळतील असा अंदाज आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर दोन गटात विभागलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचे दाखवले आहे. शिंदे गटाला 25 जागा, तर ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळतील, तर इतरांना बारा जागा मिळतील, असा अंदाज न्यूज एरिना इंडिया संस्थेने आपल्या सर्व्हेत वर्तवला आहे.

Chopda (ST) : NCP
Raver : BJP
Busawal (SC) : BJP
Jalgaon City : BJP
Jalgaon Rural : SS
Amalner : BJP
Erandol : SS
Chalisgaon : BJP
Pachora : NCP
Jamner : BJP
Muktainagar : NCP

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!