भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

फ्लॅट धारकांसाठी आता”फ्लॅट” चा ‘व्हर्टिकल सातबारा’? काय आहे योजना? व्हर्टिकल सातबारा म्हणजे काय? कसा मिळणार?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक महत्वाची बातमी राज्यातील फ्लॅट धारकांसाठी आहे. महसूल विभागाने राज्यातील फ्लॅट धारकांना त्यांच्या घराची थेट मालकी मिळवून देण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलयं. ‘व्हर्टिकल सातबारा’ या योजनेद्वारे सरकार आता जमिनीच्या मालकीचा 7/12 उतारा थेट इमारतीच्या मजल्यांसाठी देण्याचा विचार करतय. अशा योजनेचा फायदा संयुक्त कुटुंबांच्या इमारतींमधील रहिवाशांना होणार आहे.

एकाच कुटुंब असताना दोन, तीन मजली घरे बांधतात. त्या नंतर दोन तीन मुले झाल्यावर पुढच्या पिढ्यांमध्ये मालमत्तेच्या मालकीवरून किंवा वाटणीवरून कायदेशीर वाद होत असतो. मात्र व्हर्टिकल सातबारा मुळे थेट इमारतींच्या मजल्याचा सातबारा मिळवता येणार आहे.

काय आहे‘व्हर्टिकल सातबारा’
इमारतीत राहणाऱ्यांना सातबारा उतारा मिळत नाही मात्र आता ‘व्हर्टिकल सातबारा’मुळे मालकाला फ्लॅटचा स्वतंत्र सातबारा मिळणार आणि त्या मुळे घराची खरेदी-विक्री, बँक कर्ज व्यवहार, वारसाहक्क सोपं आणि पारदर्शक होणार,फ्लॅटधारकांना जागेचा थेट मालकी हक्क सिद्ध करणं सोपं होणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘व्हर्टिकल सातबारा’ योजनेचा प्रस्ताव तयार केलाय. अंतिम मसुद्यावर सध्या विचारविनिमय सुरू आहे. ‘व्हर्टिकल सातबारा’ हा महाराष्ट्रातील मालमत्ता हक्क व्यवस्थेतील ऐतिहासिक बदल ठरणार आहे. ही योजना कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!