भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

“तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आमच्या लोकांनी त्याग केला, आता झुकते माप घ्या” अमित शहांची शिंदेंना आठवण

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांमध्ये जागा वाटपाची घाईगर्दी सुरू आहे. त्यात राज्यातील सत्ताधारी महायुतीनं जागावाटपाच्या चर्चांना वेग दिला आहे. या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यागाची आठवण करुन दिली. शहांनी केलेलं विधान सूचक मानलं जात आहे.

लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेचा भाजप व अजित पवार गटा पेक्षा स्ट्राईक रेट जास्त राहिला. परंतु राज्यात महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. आणि स्ट्राईक रेट चा आधार घेत शिंदेसेनेनं विधानसभा निवडणुकीत महायुती कडे १०० जागांची मागणी केली. यावर भाष्य करताना अमित शहांनी शिंदेंना भाजपच्या त्यागाचं स्मरण करुन दिलं. “तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आमच्या लोकांनी त्याग केला,आता झुकते माप घ्या” अस सूचक सल्ला अमित शहा यांनी शिंदे याना दिला.

मुख्यमंत्री, पंतप्रधान ही पदं महत्त्वाची असतात. बाकीची पदं ही केवळ व्यवस्था असते. तुम्हाला मुख्यमंत्रिपद देताना आमच्या माणसांनी त्याग केलेला आहे, असं शहा जागावाटपाच्या बैठकीत म्हणाले. आम्ही तुमच्यासाठी त्याग केला, आता तुम्ही जागा वाटपात मित्रपक्षासाठी त्याग करा, असं शहांनी शिंदेंना सुचवलं. शहांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या सूचक वक्तव्याने शिंदे गटाला विधानसभेच्या किती जागा मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!