भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलरावेरशैक्षणिक

मोठी बातमी : बोगस विद्यार्थी पटसंख्या : रावेर व  यावल तालुक्यातील शिक्षण संस्थांमधील बनावट विद्यार्थ्यांचा मुद्दा एरणीवर

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील खासगी संस्थाचालकांनी वर्गात बोगस ( बनावट ) विद्यार्थी दाखवून शासनाची फसवणूक करून मोठी लूट करून त्या पोटी शासनाचे कोट्यावधी रुपयांची लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यात जळगाव जिल्ह्यासह रावेर व यावल तालुक्यातील काही संस्था चालकांनी आपल्या शाळांमधील वर्गाची पटसंख्या पूर्ण करण्यासाठी वर्ग कमी होऊ नये म्हणून बोगस विद्यार्थी दाखऊन तसेच एका विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळ्या शाळांमधील वर्गात प्रवेश दाखवून अनुदान लटले असल्याची चर्चा एकायला मिळते.

दरमहा होतेय शासनाची पाचशे कोटींची लूट                                                                     राज्यातील खासगी संस्थाचालकांनी आपल्या शाळांची पटसंख्या पूर्ण करण्यासाठी वर्ग कमी होऊ नये यासाठी वर्गात बोगस (बनावट) विद्यार्थी दाखवून शासनाची फसवणूक करून मोठी लूट चालवली आहे. राज्यात एकूण ५ लाख १६ हजार १८८ विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश आधार कार्ड नसताना झाला आहे. हे विद्यार्थी बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर एकेका विद्यार्थ्याचे नाव दोन – दोन संस्थांच्या शाळां मध्ये प्रवेश दाखून बोगस पटसंख्या दाखविण्यात आली आहे. राज्यात बोगस विद्यार्थ्यांवर दरमहा पाचशे कोटी रुपये खर्च केले जात असल्याची धक्कादायक माहिती उघळ झाली आहे.

रावेर व यावल तालुक्यातही बनावट विद्यार्थी.                गेल्या काही महिन्यांपूर्वी बोगस (बनावट)विद्यार्थी संदर्भात रावेर व यावल तालुक्यासह जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत चौकशी मोहीम राबविण्यात आली होती. आधारकार्ड वरून बोगस विद्यार्थ्यांचा प्रकार समोर आला. यात विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसताना प्रवेश देण्यात आला असल्याचे उघळ झाले होते. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे संस्था चालकांनी एका विद्यार्थ्याचा दोन वेगवेगळ्या संस्थांच्या शाळांमध्ये म्हणजेच दोन ठिकाणी प्रवेश दाखविल्याचे उघळ झाले होते. व त्या संस्था चालकांना रावेर शिक्षण विभागाकडून ही बोगस नावे कमी करण्याचे सांगण्यात आले होते. त्या वेळी रावेर तालुका शिक्षणाधिकारी दखने साहेब यांच्याशी चर्चा करीत असताना सांगण्यात आलं होतं.

प्रकरणे दडपली की काय?                                          परंतु या बोगस विद्यार्थी दाखऊन शासनाची फसवणूक करून लाखो रुपये शासनाचे अनुदान लाटनाऱ्यांवर कारवाई झाल्याची कुठलीही माहिती समोर आली नाही. या संगितलीही जात नाही, या बाबत रावेर शिक्षणाधिकाऱ्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन रिसिव्ह करीत नाही. शिक्षण विभागाकडून  पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. बनावट विद्यार्थी व पटसंख्या कमी होऊ नये म्हणून एका विद्यार्थ्याचे दोन वेगवेगळ्या शाळांमधील वर्गात प्रवेश दाखविल्याचे उघड झाल्याची ही प्रकरणे स्थानिक स्थरावर ऍडजेस्टमेन्ट केल्याची चर्चा आहे …… हाच प्रकार रावेर व यावल तालुक्यासह जिल्ह्यात आहे. … क्रमशः

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!