आणखी एक नवा कोरोनाचा
‘C.1.2’ व्हेरीयंट आढळला,
दोन्ही लसीचे डोस घेणाऱ्यांनाही धोका
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवीदिल्ली(वृत्तसंस्था)। भारतासह संपूर्ण जगात हैदोस घालणाऱ्या कोरोनाचा एक नवा विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे प्राप्त होणारे सुरक्षा कवच भेदून पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढली असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे
कोरोनाने अवघ्या जगाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या प्राणघातक विषाणूचे जगभरात आतापर्यंत सुमारे 21,73,49,315 रुग्ण आढळले. तर 45,17,863 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. अवघे जग या विषाणूचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील असताना आता दक्षिण आफ्रिका व अन्य काही देशांत या विषाणूचे आणखी एक धोकादायक उत्परिवर्तित रूप आढळले आहे.
‘गत मे महिन्यात दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे ‘C.1.2’ हे उत्परिवर्तित रूप आढळले. तेव्हापासून गत 13 तारखेपर्यंत हा व्हायरस चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल व स्वित्झलंड या ७ देशांत पसरला आहे, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेच्या ‘नॅश्नल इंस्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीज ‘(एनआयसीडी) व ‘ lक्वाझुलु l, नॅटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेंसिंग प्लॅटफॉर्म’च्या ( केआरआयएसपी ) संशोधकांनी सोमवारी दिली . हा व्हायरस कोरोनाच्या पहिल्या लाटेत आफ्रिकेत आढळलेल्या C.1.2 च्या तुलनेत अधिक उत्परिवर्तित झाला आहे. त्यामुळे त्याला चिंताजनक विषाणूंच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. C.1.2,चा वार्षिक उत्परिवर्तन दरणिब्बल 41.8 एवढा आहे. त्यामुळे तो अधिक धोकादायक ठरण्याची भीती आहे. विशेषतः त्यात होणारे बदल पाहता तो कोरोना प्रतिबंधक लसीमुळे निर्माण होणाऱ्या रोगप्रतिकारक क्षमतेलाही चकवा देऊ शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.