भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट असेल का?कोरोनाचा समारोप जवळ आलाय का ?काय म्हणत WHO

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली ,वृत्तसंस्था। गेल्या दोन वर्षांपासून कोरोना या विषाणूने माणसांच जगणं मुश्किल करुन ठेवलं आहे. कोरोनाच्या लाटांमागून लाटा येत असून संपूर्ण जगच या डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूमुळे वेठीला धरलं गेलं आहे.

भारतात सध्या कोरोनाची तिसरी लाट आली असून ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे ती आल्याचं तज्ज्ञ सांगतात. कोरोना या विषाणूचे अनेकानेक व्हेरियंट प्रसारित होत असून डेल्टानंतर आता ओमिक्रॉनचा धुमाकूळ पहायला मिळतो आहे.

डेल्टा या व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनची लाट तशी सौम्य असल्याचं दिसून येतंय. त्याच्या संसर्गाची संख्या तीव्र असली तरीही गंभीर होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र, ओमिक्रॉन हा आता शेवटचा व्हेरियंट असेल का? अशी चर्चा सुरु आहे. कोरोनाचा हा सगळा खेळ गेल्या दोन वर्षांपासून सुरु असून आता त्याचा समारोप जवळ आलाय का? अशीही शक्यता अनेकांकडून व्यक्त केली जात असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय की, ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट असेल किंवा आपण आता कोरोनाचा शेवटचा खेळ खेळत आहोत, असे मानणे धोकादायक आहे.

कोरोना या विषाणूची आता पर्यंत जगभरात सुमारे ३५.१ कोटी लोकांना बाधा झाली आहे. तर जगभरात ५६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णंसंख्येमध्ये आणि कोरोनाच्या मृत्यूसंख्येमध्ये जगभरात अमेरिकेचा क्रमांक पहिला लागत असून त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत ३.९५ कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली असून ४.९ लाख म्हणजेच जवळपास पाच लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!