श्री राम मंदिराच्या पुजार्यांबाबत सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट; सावदा येथे गुन्हा दाखल
सावदा, ता. रावेर, मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | अयोध्येतील श्रीराम मंदिर येथील नवनियुक्त झालेले पुजारी मोहित पांडे यांच्या विरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट करून ती व्हायरल केल्या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला एका तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- फैजपूर मध्ये अवैध कत्तलखाना उध्वस्त, २२० किलो गोवंश जातीचे मास जप्त
- मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यात बोगस शिक्षकांवर कारवाई, ५१ बोगस शिक्षकांचं वेतन बंद, शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
- अवैध गुटख्यासह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
- बलवाड़ी येथे पनामा रोगावर कार्य शाळा
- मालकाचेच गोडाऊन फोडून चोराला साडेआठ लाखांचा पापड मसाला, चौघांना पोलिस कोठडी
यावल तालुक्यातील कोळवद येथील रहिवासी असलेले अभय महाजन याने सोशल मीडियात अयोध्या येथील नियोजीत श्रीराम मंदिराच्या प्रमुख पुजारीपदी अलीकडेच नियुक्त करण्यात आलेले पुजारी मोहित पांडे यांच्या विरोधात सोशल मीडियात त्यांचा फोटो मॉर्फ करून एक पोस्ट फेसबुकवरून शेअर केली.
या घटनेने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून सावदा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार, अभय महाजन रा. कोळवद, ता. यावल. याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा व्यक्ती एका राजकीय पक्षाचा सोशल मीडिया पदाधिकारी असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सदरील प्रकरणाचा तपास स पो नि जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ विनोद खांडबहाले करीत आहेत.