भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावनंदुरबार

शिक्षणाधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना अटक

जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l कडून सादर शाळा बंद असले बाबत प्रमाणपत्र देनेसाठी, तसेच शाळेची आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे बदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामांचे मिळून आलोसे यांनी ५००००/- ची लाच मगीतल्या प्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नंदुरबार, याना नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

तक्रारदार हे ३५ वर्षीय पुरुष असून यांना नवापूर शहर, नगरपालिका, मालमत्ता क्र. ८२६, सीटी सर्वे क्र. ६२४, पंचरत्न शॉपिंग, काँप्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरु करावयाची असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने FL ३ परवाना देण्यास हरकत घेतली.

परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभाग कडून सादर शाळा बंद असले बाबत प्रमाणपत्र देनेसाठी तसेच अशरफ भाई माजिदभाई लखानी अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर, या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माद्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे बदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामांचे मिळून प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी यांनी ५००००/- ची मागणी करुन दि. १५/०५/२०२४ रोजी त्यांचेच जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात ५००००/- लाच घेताना नंदुरबार जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष सुरेश चौधरी, वय ५२ वर्षे, जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नंदुरबार, वर्ग-१, रा. प्लॉट नंबर ५२, शांतीनगर, वाघेश्वरी मंदिराजवळ, नंदुरबार (अरविंद देसले यांचे घरात) मुळ.राहणार . प्लॉट नंबर ८, गट नंबर ३५, मुक्ताईनगर, तालुका जिल्हा-जळगांव याना रंगेहाथ पकडले असून यांचेवर नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सापळा अधिकारी नितीन पाटील, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. सह सापळा पथकात पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे,
पो.ना. गणेश निंबाळकर आदींनी केली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!