भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराष्ट्रीय

अरे देवा..आता..त..कमालच झाली…! बटाटाही…तुम्ही खाताय तो बटाटा नकली तर नाहीना?

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सध्याचा जमाना आता भेसळीचा आलाय, सर्वच खाण्याच्या पदार्थात भेसळ येऊ लागली आहे. तेलात भेसळ,दुधात भेसळ, मावा,पनीर यांसह अगदी सर्वच खाण्याच्या पदार्थात भेसळ केली जात आहे. कलियुगात कशात कशाची भेसळ करतील हे सांगता येत नाही. या भेसळी मुळे आरोग्यावर परिणाम होत असताना आता तर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुम्हाला माहितीय नफेखोर व्यापाऱ्यांनी भाज्यांमध्ये महत्वाचा व रोजच्या खाण्यात येणारे शेतात पिकणारे बटाटे देखील खाण्याच्या लायक ठेवले नाही. बटाटे चक्क आता केमिकल्स वापर करुन तयार केले जात असल्याचे समोर आले आहे.

अन्न सुरक्षा पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. बिहारच्या पाटणा येथील मीठापुर आणि मीनाबाजारातून छापेमारी करुन केमिकलयुक्त नकली बटाटांच्या साठा जप्त केला आहे. हे बटाटे गेरुची माती आणि केमिकल्सचा वापर करुन तयार केले होते. ते अगदी हुबेहूब खऱ्या बटाटांप्रमाणे दिसत होते. या कारवाईत दोन ट्रक बटाटे जप्त करण्यात आले. या बटाट्यांना तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत . हे बटाटे २० ते २५ रुपये किलो दराने घेऊन ७० ते ७५ रुपये प्रति किलो दराने विकले जातात.

प्राथमिक तपासात असे समोर आले की छत्तीसगड येथून रोज सकाळी सहा वाजता हे बटाटे मागवले जात होते. त्यांना व्यापारी मंडईत विकून नंतर विविध ठिकाणी विकले जात होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, नकली बटाटे गेरू व केमिकलच्या सहाय्याने बनविण्यात येत असून ते वासाने आणि रंगाने ओळखता येतात नकली बटाटे हे असली बटाट्यापेक्षा  वेगळे दिसतात. नकली बटाटे पाण्यात तरंगतात मात्र खरे बटाटे पाण्यात बुडतात . नकली बटाट्यांना तीव्र रासायनिक वास आणि चमकदार आच्छादन आणि दोन दिवसात खराब होत असल्याने त्यांना ओळतखता येते. या बटाट्याचा सुंगध नैसर्गिक बटाट्यांसारखा येत नाही. त्याऐवजी रासायनिक वास येतो. कापल्यानंतर आतील आणि बाहेरील रंगांचा मेळ बसत नाही.

खाद्य सुरक्षा अधिकारी यांनी अजय कुमार यांनी सांगितले की, नकली बटाटे गेरू व केमिकलच्या सहाय्याने बनविण्यात येत असून ते वासाने आणि रंगाने ओळखता येतात नकली बटाटे हे असली बटाट्यापेक्षा  वेगळे दिसतात. नकली बटाटे पाण्यात तरंगतात मात्र खरे बटाटे पाण्यात बुडतात . नकली बटाट्यांना तीव्र रासायनिक वास आणि चमकदार आच्छादन आणि दोन दिवसात खराब होत असल्याने त्यांना ओळतखता येते. या बटाट्याचा सुंगध नैसर्गिक बटाट्यांसारखा येत नाही. त्याऐवजी रासायनिक वास येतो. कापल्यानंतर आतील आणि बाहेरील रंगांचा मेळ बसत नाही.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार अशा प्रकारे बटाटे तयार केल्याने लोकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.या नकली बटाट्यात वापरलेले केमिकल्स ने बद्धकोष्ठता, सूज आणि भूक न लागण्याची समस्या निर्माण होऊन लिव्हर आणि किडनी दोन्हीसाठी नुकसान दायक असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!