भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

रेशनिंगचा तांदूळ काळ्याबाजारात

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील साकळी येथे कॉलनी वसाहतीत रेशनिंग चा तांदूळ जास्त नफा मिळविण्याच्या हेतूने कळ्या बाजारात नेण्यासाठी ट्रॅक मध्ये भरीत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याबाबत यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

शासना कडून गोरगरिब नागरिकांना स्वस्त धान्य दुकाना मार्फत मोफत तांदूळ, गहू , ज्वारी वाटप होत असते. मात्र काही दुकानदार गोदाममध्ये एकत्रित करून जास्त नफा मिळवण्यासाठी बाहेरगावी कळ्या बाजारात विक्री साठी पाठवतात. अशीच गुप्त माहिती मिळाल्याने यावल पोलिसांनी सापळा रचून साकळी येथील कॉलनी वसाहतीतील पत्री शेडमधून ट्रक मध्ये रेशनचा तांदुळ भरताना रंगेहात पकडले. या बाबत पुढील कारवाई सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!