भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

गुढी पाडव्याच्या दिवशीचं संसाराची राख रांगोळी, शुल्लक कारणावरून पत्नीला संपवलं.. बाप जेल मध्ये.. आई देवाघरी… तीघं लेकरांचा मातृछत्र हरपल…

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गुढी पाडावा मराठी नाव वर्षाचा पहिला दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू असताना जळगाव जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे.या घटनेनं संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मराठी नवीन वर्षाच्या दिवशी जळगाव मध्ये एक नवीन धक्कादायक घटना घडली. जिल्ह्यातील निमखेडी गावात पतिपत्नी मध्ये वाद झाला. वाद वाढत जाऊन वादाचे रूपांतर झटापटीत झाले.या वादात संतापाच्या भरात पतीने पत्नीच्या मानेवर वीळ्याने आणि पोटावर सपासप वार करून गुढी पाडव्याच्या दिवशी घरातच पत्नीला संपविले.या दुर्दैवी घटनेने निमखेडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून तीन मुलांचं मातृछत्र हरपल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील नितीन विजय सोनवणे वय ३५ वर्ष.  हा दिपाली सोनवणे वय २८ वर्ष. आणि आपली दोन मुलं व एक मुलगी यांच्यासोबत निमखेडी गावात राहत होता. नितीन सोनवणे हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत कौटुंबिक वाद सुरू होते. गुरुवारी दुपारी पुन्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाच्या भरात संतापलेल्या नितीन सोनवणे याने लोखंडी विळ्याने पत्नीच्या मानेवर व पोटावर वार केले. या हल्ल्यात दिपाली सोनवणे गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.घरात आनंदाच्या दिवशी सर्वत्र रक्तच माखलं होते.

घटनेनंतर आरोपी नितीन सोनवणे हा स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. मृत महिलेच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!