भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळ तालुक्यात यात्रेत ”बारागाड्यां” खाली येऊन एकाचा मृत्यू

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ तालुक्यात यात्रेत बारागाड्या ओढताना दुःखद घटना घडली. तालुक्यातील सुनसगाव जवळील गोजोरा येथे दिनाक १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी श्री मरी मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित ‘बारा गाड्या’ कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात घडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

दरवर्षीप्रमाणे दि. १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी चोरवड–गोजोरा रस्त्यावर श्री मरी माता यात्रेनिमित्त पारंपरिक ‘बारा गाड्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या गाड्या ज्ञानेश्वर सोनवणे हे ओढत होते. कार्यक्रम सुरू असताना चौथ्या व पाचव्या गाडीखाली एका हाताने अपंग असलेले अशोक बाबुराव कोळी. वय ५७ वर्ष. हे अचानक गाड्यां खाली आल्याने त्यांच्या अंगावरून गाड्या गेल्या व ते त्यात  गंभीर जखमी झाले.

जखमी अशोक कोळी यांना तात्काळ भुसावळ येथील डॉ. राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मृत अशोक कोळी यांच्या पश्चात पत्नी, मुले व मुलगी असा परिवार आहे. या घटनेची माहिती भुसावळ तालुका पोलिसांना देण्यात आली असून संबंधित प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!