क्राईममुक्ताईनगर

अंतुर्ली, नायगावसह परिसरात ऑनलाइन भिंगरी जुगार, सट्टा जोमात; मुक्ताईनगर पोलिस आर्थिक हितसंबंध जोपासण्यात!

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज- अक्षय काठोके: तालुक्यातील महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या अंतुर्ली व नायगाव परीसरातील गावामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सट्टा व ऑनलाईन भिंगरी जुगार खेळवले जात असून यामुळे हजारो युवकांच्या हातचा पैसा ह्या जुगार गेम मध्ये वाया जात असून ते देशोधडीला लागत आहे

तालुक्यांभरात प्रमुख ठिकाणीच हे ऑनलाईन भिंगरी जुगार अड्डे सुरू आहेत. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल येथे होेते. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना नादी लावण्याचे काम या जुगार अड्ड्यांवर केले जात आहे. पोलिसांना या सट्टा व अवैध जुगार अड्ड्यांची पुरेपूर माहिती आहे. दाखविण्यासाठी दोन-तीनदा धाडी टाकायच्या व नंतर आपली हत्ते वसुली वाढवायची, हा प्रकार नित्याचाच झाला असल्याचं नागरीक बोलतं आहेत.

तीन दिवस आधी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी हिवाळी उद्देशनात हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुक्ताईनगर शहरातील अवैध धंदे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेले आहे पण काही दिवसांच्या कालावधीसाठी सर्व बंद करण्याचे आदेश पोलीसांकडून आल्याची चर्चा असून मात्र, अंतुरली शिवार व ग्रामीण भागात अवैध धंदे बिनबोभाट सूरु असून मुक्ताईनगर पोलीस कारवाई न करण्यामागचे आर्थिक देवाण घेवाण असल्याची चर्चा सामान्य नागरिकांमद्ये रंगताना पाहायला मिळत आहे.

मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते सह पोलीस स्टेशनला नागरिकांनी अवैध धंद्याबाबत माहिती देऊन कारवाई करण्याच्या तक्रारीर नागरिकाना पोलिस अधिकारीच दम देऊन हकलुन लावत त्यांच्या कुठ नांदी लागता जाऊद्या म्हणुन वेळ मारून नेत अवैध धंदे वाल्यांना तक्रार करण्यास आलेल्याची नावे व माहिती खुद्द पोलीस अधिकारीच देत  असल्याचीही चर्चा तालुक्यातील नागरिकांमध्ये कुजबुजायला येत आहे. विशेष म्हणजे मुक्ताईनगरच्या पोलिस निरीक्षकांकडून काही पत्रकारांचे व्हाट्सअप नंबर सुद्धा ब्लॉक केलेले आहेत या मागचे कोडे न उमगणारे आहे ….?

सदरील परिसरात सट्टा मोठ्या प्रमाणात पोलीसांच्या आर्थिक हितसंबंधांच्या जोरावर बिनदिक्कत चालत असल्याची ओरड नागरीक बोलून दाखवत आहे. यामुळें मुक्ताईनगर पोलीस निरीक्षकाची अवैध धंदे वाल्यांना सुट देत कारवाईस टाळाटाळ होत आहे. तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अधिवेशनात आवाज उठवल्यानंतरच अवैध धंद्यावर का कारवाई केली जाते व नंतर जैसे थे का परिस्थिती असते असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत याबाबत जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे आता बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!