ब्रेकिंग : रावेरच्या हनी ट्रॅप प्रकरणात १०० च्या वर जण अडकल्याची शक्यता, अनेक प्रतिष्ठितांसह एका मोठ्या नावाचा समावेश?
विशेष प्रतिनिधी |
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर च्या हनी ट्रॅप प्रकरणात एका प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडिओ चित्रित करून त्या आधारे ब्लॅक मेल करून प्रतिष्ठित व्यक्ती कडून चोपडा तालुक्यातील लोणी अडावद येथील “प्रतिभा” नामक महिलेने लाखो रुपये उकळल्याची घटना नुकतीच समोर आली. या घटनेने परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली. अशा या हानी ट्रॅप प्रकरणात आणखी बरेच जण अडकल्याची मोठी चर्चा परिसरात सुरू आहे.
सदर महिलेने रावेर शहरातील ४३ वर्षीय व्यक्तीला व्हिडिओ व्हायलर करण्याची धमकी देत आता पर्यंत ११ लाख रुपये उकळले असून तिच्याकडून पाच कोटी रुपये हातउसने घेतल्याच्या खोट्या पावतीचा नोटरी करारनामा २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर व्यक्ती कडून करून घेतला. या संदर्भात संबंधित प्रतिष्ठित धनदांडग्या व्यक्तीने नेहमीच्या ब्लॅकमेलिंग च्या प्रकाराला कंटाळून अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी “त्या” ब्लॅकमेलर महिलेला अटक करून त्या सोबत तिच्या मुलगा निर्मल चुन्नीलाल पाटील वय २१. यालाही अटक केली.
पोलिस तपासा दरम्यान महिले कडून अनेक धक्कादायक माहिती समोर आल्याचं सांगितल जात आहे. या महिलेच्या मोह जालात रावेर शहर व परिसरातील सुमारे अनेक प्रतिष्ठित व धनदांडग्या व्यक्तींसह १०० जणांच्या वर जण अडकल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिस कसून तपास करीत असून पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला असून त्या मोबाईल मधून पोलिस तपासात अनेक अश्लील व्हिडिओ, फोटो, संभाषण अशी अनेक पुरावेही सापडले असल्याचं सांगितलं जातंय. ब्लॅकमेलर महिला ही एकटी आहे की तिच्या सोबत आणखी कोणी महिला आहे . हे तपासात पुढे येईलच. तसेच तिच्या सोबतीला मध्यस्थी करणारे अथवा प्रतिष्ठित व धनाढ्य व्यक्ती कोण या बद्दल माहिती देणारे दलाल कोण? या बद्दलही माहिती पोलिस तपासात उघळ झाल्याचीही माहिती मिळत आहे.
या सोबतच एक धक्कादायक माहिती अशीही समोर आली आहे की, या महिलेच्या मोहजालात अनेक व्यापाऱ्यांसह डॉक्टर, वकील, अनेक सरकारी अधिकारी, माजी नगरसेवक ,वन व पोलिस विभागाचे काही कर्मचारी, व्यावसायिक,राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सह महत्त्वाचे म्हणजे यात प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्ती सह आणखी एक मोठं नाव या १०० जणांच्या यादीत असल्याच सांगितले जात आहे. मोठं नाव कोणाचं? या बाबत परिसरात मोठी चर्चा सुरू असून ही नावे लवकरच समोर येण्याची शक्यताही सांगितलं जात आहे. या महिलेले धनाढ्य व्यक्तींनाच मोहजालात अडकवले आहेत. आणखी नवनवे अनेक खुलासे पोलिस तपासात समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या महिलेच्या मोहजालात आणखी कोण कोण अडकले ? याची चर्चा रावेर शहर व परिसरात ठिकठिकाणी सुरू असून इतकेच नव्हे तर शासकीय कार्यालयां मध्येही या बाबत मोठी चर्चा चवीने रंगत असल्याचे दिसून आले.