भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

कोरोना काळात शासकिय यंत्रणे द्वारा उभारण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट भाडेतत्त्वावर देवून कार्यान्वित करावे – आ.एकनाथराव खडसे यांची अधिवेशनात लक्षवेधी द्वारे मागणी

नागपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | कोरोना काळात शासकिय यंत्रणेद्वारे शासकीय निधीतून उभारण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट वापरा अभावी निष्क्रिय अवस्थेत पडून असल्या बाबत माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्नाद्वारे शासनाच्या लक्षात आणून दिले तसेच हे प्लांट भाडेतत्वावर देऊन कार्यान्वयीत करून शासनाच्या उत्पन्नात वाढ करून रोजगार निर्मिती करावी अशी मागणी त्यांनी केली.


यावेळी आ. एकनाथराव खडसे म्हणाले “कोरोना काळात राज्यभरात ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, सिव्हील हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालये येथे तातडीने आणि मोठ्या प्रमाणात
उभारण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट आज सध्या निष्क्रिय अवस्थेत पडलेले निदर्शनास येत आहे त्या काळात प्राणवायूच्या अत्यंत तीव्र टंचाईमुळे जीव वाचवण्यासाठी शासन यंत्रणा समाजसेवी संस्था यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या प्लांटची उभारणी केली मात्र आज कोरोना महामारी ओसरल्यानंतर राज्यात कुठेही या प्लांटचा प्रत्यक्ष वापर होत नाही अनेक ठिकाणी ती बंद पडून गंजेपर्यंत धूळ खात आहेत, या निष्क्रिय अवस्थेत असलेल्या ऑक्सिजन प्लांटचा वापर औद्योगिक क्षेत्रात त्वरित होणे गरजेचे आहे उद्योग क्षेत्रात उत्पादन प्रक्रियेसाठी ऑक्सिजनची सतत आवश्यकता असते हे प्लांट खाजगी उद्योग क्षेत्रातील उद्योग कंपन्यांना भाडेतत्वावर चालवण्यासाठी देण्यात यावे यातून रोजगारनिर्मिती होईल आणि शासनाचा खर्चही उपयोगात येइल,

सदर ऑक्सिजन प्लांट भाडेतत्त्वावर देवून तात्काळ कार्यान्वित करण्याची आवश्यकता असून यातून,शासनाला भाड्याच्या स्वरूपात महसुल मिळेल तसेच प्लांटची मशिनरी सुद्धा कार्यान्वयीत होऊन सुस्थितीत राहील, तरी शासनाने तातडीने या प्लांटचे सर्वेक्षण करून औद्योगिक वापरासाठी भाडेतत्वावर हस्तांतरण करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी केली अन्यथा शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाण्याची शक्यता असल्याचे एकनाथराव खडसे यांनी लक्षवेधी मांडताना सांगितले
तसेच उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे उभारण्यात आलेला प्लांट अपूर्णावस्थेत असताना त्याची संपूर्ण देयके प्लांट उभारणी करणाऱ्या कंत्राटदाराला अदा करण्यात आलेली आहेत त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली.


सदर लक्षवेधीला सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण
मंत्री प्रकाश अबिटकर यांनी उत्तर देताना सांगितले
कोरोना काळात राज्यभरात ५०० प्रेशर स्वींग अँडसॉर्पशन ऑक्सीजन प्लांट व ३९४ लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आले आहेत. कोविड १९ चे पहिल्या लाटेत रुग्णसंख्या वाढण्यास मार्च २०२० पासून सुरुवात झाली.
सदरच्या कालावधीत गंभीर / अत्यवस्थ रुग्णांना मेडीकल गॅस पाइपलाईन व्दारे तसेच ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर व्दारे ऑक्सीजनचा पुरवठा करून सुविधा देण्यात आल्या. तसेच कोविड १९ ची दुसरी लाट जून २०२१ पर्यंत होती, त्यात रुग्णसंख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्याने दुसऱ्या लाटेनंतर गंभीर स्थिती उदभवू नये व रुग्णांचे प्राण वाचविणेकरिता शासन स्तरावरून तातडीने प्रेशर स्वींग
अँडसॉर्पशन ऑक्सीजन प्लांट आणि लिक्वीड मेडिकल
ऑक्सीजन प्लांट उभारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.


कोविड काळात ऑक्सीजन प्लांट स्थापित झाल्यानंतर ऑक्सीजन प्लांट मधून निर्मिती झालेली आहे. तदनंतर कोविडचे रुग्ण नसल्यामुळे ऑक्सीजनची अधिक प्रमाणात गरज भासलेली नाही. तसेच प्रेशर स्वींग अँडसॉर्पशन ऑक्सीजन प्लांट मधून ऑक्सीजन निर्मिती करण्यासाठी विजेचा वापर अधिक प्रमाणात होतो. विजेचे बिल जास्त येत असल्याने व तुलनेने ऑक्सीजनची आवश्यकता असणारे रुग्ण अतीशय कमी संख्येने दाखल होत असल्याने प्रेशर स्वींग अँडसॉर्पशन ऑक्सीजन प्लांट ऐवजी लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन प्लांट व ऑक्सीजन सिलेंडर मार्फत आवश्यक ऑक्सीजनची पुर्तता करण्यात येत आहे.
केंद्रशासनाच्या मार्गदर्शन सुचनेनुसार दर तीन महिन्यांनी
प्रेशर स्वींग अँडसॉर्पशन ऑक्सीजन प्लांटचे मॉक ड्रिल
घेऊन प्लांट कार्यरत असल्याबाबत आढावा घेतला जातो.

प्रेशर स्वींग अँडसॉर्पशन ऑक्सीजन प्लांटसार्वजनिक खाजगी भागीदारी या (पी पी पी) तत्वावर चालविण्यास देणेबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन आहे. त्यामुळे प्लांट कार्यान्वित राहुन आरोग्य संस्थाना आवश्यक ऑक्सीजन प्राप्त होईल व खाजगी संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या ऑक्सीजनवरील खर्चातशासनाची बचत होईल. तसेच प्रेशर स्वींग अँडसॉर्पशन ऑक्सीजन प्लांट आणीबाणीच्या परिस्थितीसाठी कार्यरत राहतील.
सध्यस्थितीत शासन स्तरावर २९५ मोठे प्रेशर स्वींग अँडसॉर्पशन ऑक्सीजन प्लांट (पी पी पी) तत्वावर देणेकरीता विचाराधीन आहे व १७० छोटे प्लांट ची देखभाल व दुरुस्ती जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत (डी 4पी डी सी)मधील निधीचा वापर करून कार्यान्वित ठेवणेबाबत प्रस्तावित आहे. कोविड काळात पुरविण्यात आलेले कोणतेही प्लांट विनावापर राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी सांगितले.

तसेच उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे उभारण्यात आलेला प्लांट अपूर्णावस्थेत असताना त्याची संपूर्ण देयके प्लांट उभारणी करणाऱ्या कंत्राटदाराला अदा करण्यात आले असल्याची चौकशी करण्यात येईल व यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे
सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!