क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून युवकाचा खून : संशयित ताब्यात !
पाचोरा, मंडे टू मंडे वृत्तसेवा : पाचोरा शहरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून युवकाचा खून झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा शहराच्या पुनगाव रोड रस्त्यावरील बुर्हानी इंग्लिश मेडियम स्कूलच्या आवारात तरुणांच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून भूषण नाना शेवरे (वय – २३) रा. दुर्गा नगर, पाचोरा या तरुणाला तीक्ष्ण हत्याराने भोसकुन गंभीर जखमी केल्याची घटना काल सायंकाळी घडली. गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले असता त्यास पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले. उपचारा दरम्यान जखमी तरुण हा मयत झाला.
या प्रकरणी मुख्य आरोपी सह काही संशयितांना ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा पर्यंत लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील आणि पवन पाटील (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुरनं ४२/२०२२ भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४, ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील आणि अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.