भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

पाल परिसरातील नुकसानग्रस्त भागाची आ. शिरीष चौधरी यांनी केली पाहणी

Monday To Monday NewsNetwork।

पाल. ता. रावेर ,प्रतिनिधी (सुरेश पवार)। दि 12। 6।2021 रावेर तालुक्यात मागील 29 तारखेला चक्रीवादळ वादळ सह जोरदार पाऊस झाला होता या चक्री वादळामुळे पाल परिसरातील शेतकऱ्याचा केळी बागांच्या खूप मोठे नुकसान झाले होते केळीचे सम्पूर्ण बागच उध्वस्त होऊन शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला होता त्याच बरोबर या वादळी वाऱ्यामुळे अनेक घराचे पत्रे उडून घराचे नुकसान होऊन गोर गरीब मजुरवर्गाचा संसार उघड्यावर आला आहे या सर्व झालेल्या नुकसानीची पाहणी करण्या करिता रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकशनीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर सोडू नका असे सांत्वन केले त्याचबरोबर रावेर तालुक्यातील नुकसानीच पाठपुरावा शासन दरबारी करू लवकरात लवकर नुकसान भरपाइ मिळून देण्याचे प्रयत्न कृरू असे आश्वासन दिले.

या वेळी पाल येथील प्राजक्त धांडे ,करणसिंग जाधव, प्रमोद भंगाळे,हमीद भायका तडवी,भीमसिंग चतरु चव्हाण,विजय देवसिंग पारधी, मनीष बाविस्कर यां नुकसान ग्रस्थ शेतकरी,मजूर यांच्याशी भेटून झालेली नुकसानाची पाहणी केली तसेच गुलाबवाडी, जीन्स विश्राम जिंसी येथेही भेट देऊन पाहणी केली यावेळी सा विकास मंडळ पाल सचिव अजित पाटील,कृषी विज्ञान केंद्र पाल चे संचालक महेश महाजन,धीरज नेहते,कामिल तडवी,संजय निराधार समितीचे सदस्य देविदास हडपे,संजय पवार,लक्ष्मण पवार,सत्तार तडवी जिंसी पोलीस पाटील जेवलाल पवार,बंजारा टायगर्स चे नंदकिशोर चव्हाण,भानुदास चौधरी, युनूस इस्माईल तडवी, उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!