आरोग्यमहाराष्ट्रराजकीय

विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार-नाना पटोले

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। नाना पटोले यांनी काल अकोल्यात बोलताना, प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्याचे संकेत दिले होते. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असं पटोले म्हणाले. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कोरोना रुग्णालयांना भेट देण्यासाठी नाना पटोले सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत ,कालच शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत येत्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले.

शिवशाहीला नव्हे पेशवाईला धक्का बसेल
नाना पटोले यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी करण्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने पटोले यांना विचारण्यात आलं, त्यावर नाना पटोले म्हणाले, येत्या निवडणुकीत “संभाजीराजे छत्रपती आणि वंचित आघाडी एकत्र आले तर त्याचा फटका शिवशाहीला नव्हे तर पेशवाईला बसेल”

केंद्राकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ
कोरोनानंतर उद्भवणार्‍या आजारावर केंद्र सरकारकडे इंजेक्शन उपलब्ध असतानाही ते राज्याला देत नाही. आज राज्यात 50 हजार पोस्ट कोव्हिडचे रुग्ण असताना, केवळ चार ते पाच हजार इंजेक्शन देतात. बाहेर या इंजेक्शनचा काळा बाजारा केला जातो. यामुळे अनेकांना आपले जीव तर काहींना आपले अवयव गमवावे लागले आहेत. मात्र केंद्र सरकारला सामान्य माणसाशी काहीही घेणे देणे नाही. ते सामान्य माणसाच्या जीवाशी खेळत आहेत, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!