भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

लिप्ट देणं पडलं महागात,अल्पवयीन मुली सोबत छेडछाड करत विनयभंग

यावल, मंडे टु मंडे न्युज | ओळखीचा असल्याने दुचाकीवर लिप्ट दिलेल्या तरुणान मदतीचा गैरफायदा घेत दुचाकीवर बसलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची संतापजनक घटना यावल तालुक्यात घडली.

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेला एक व्यक्ती १३ सप्टेंबर रोजी भावाच्या ११ आणि ९ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना घेऊन जेवण करण्यासाठी शेजारच्या गावात दुचाकीवर गेला होता. जेवण आटोपून तो भावाच्या दोन्ही मुलींना घेऊन दुचाकीने गावाकडे परत येत असताना, वाटेत त्याला त्याच गावातील नंदराज मोरे नावाचा तरुण भेटला. त्याने लिफ्ट मागितली असता ओळखीचा म्हणून त्याने मदत म्हणून मोरेला दुचाकीवर बसवले. मोरे हा दुचाकीवर मागे, ९ वर्षांच्या मुलीच्या मागे बसला.रस्त्याने त्याने पुढे बसलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील छेडछाड करत विनयभंग केला.

सदरची घटना घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने घरी आलेवर घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. लागलीच मुलीच्या काकांनी यावल पोलीस स्टेशनला नंदराज मोरे याचे विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला नंदराज मोरे विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!