केंद्राची मोठी घोषणा : पेट्रोल ९.५ रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त !
नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मोदी सरकारने केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेल आता स्वस्त झाले आहे. पेट्रोल ९.५० रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- मुक्ताईनगर ची लढत लक्ष्यवेधी, पूर्वीच्याच प्रतिस्पर्ध्यांमध्येच मुख्य लढत..कोण जिंकणार..
- मुक्ताईनगर मतदार संघ : मतमोजणी व निकालाचा असा असेल कार्यक्रम
- आमदार पुत्रांमंध्ये प्रतिष्ठेची लढाई, तिरंगी लढतीत रावेर मध्ये कोण बाजी मारणार..आता प्रतीक्षा निकालाची
केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करत जनतेला मोठा दिलासा दिला. ही माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलेंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल. इंधनावरील अबकारी कर कमी केला जाणार आहे. अबकारी कर कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डीझेल स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपशासित राज्यांमध्ये याची अंमलबजावणी लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरात पेट्रोल, डिझेल महागाई विरोधात काँग्रेसने आंदोलन सुरु केले होते. सिलेंडर बाबतीतही मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. रशिया-युक्रेन युध्दा दरम्यान वाढलेल्या महागाईमुळे केंद्र सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. यावर आता हा निर्णय घेतला आहे.