एकनाथ खडसेसह तिघांचे फोन समाजविघातक घटक सांगून टॅपिंग– राऊतांची धक्कादायक माहिती
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा | राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात (Phone tapping case) आता आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा तब्बल 60 दिवस फोन टॅप करण्यात आला होता तर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला होता. त्याननंतर आता या नेत्यांचे फोन समाजविघातक घटक नावाखाली टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पटोले, एकनाथ खडसे आणि माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचे खोटे सांगून आमचे फोट टॅप करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.
राऊत म्हणाले, “नाना पटोले, एकनाथ खडसे आणि माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचे खोटे सांगून आमचे फोट टॅप करण्यात आले. गृहविभागाकडून आम्ही सामाजविघाट घटक असल्याचे सांगत फोन टॅपिंगची परवानगी रश्मी शुक्ला यांनी घेतली. त्यावेळी राज्यात महाविकासआघाडी सरकार तयार होत होते.
आमच्यावर नजर ठेवण्यासाठी आमचे फोन टॅपिंग करून आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला. एका पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे काम करण्याची अपेक्षा ठेवतो. परंतु, एका राजकीय पक्ष आणि नेत्याला प्रति आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे सर्व करत होती. आणि आता रश्मी शुक्लांना केंद्र सरकार संरक्षण देत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे, ” असा आरोप त्यांनी केला आहे.