भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

“पितर पक्ष हा पुर्वजांची सेवा करण्याचा पुण्य काळ” – ह.भ.प सुरेशजी पाठक.

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव येथील नेरीनाका परीसरातील पांजरपोळ गोशाळेच्या पवित्र भुमीवर पित्रृ पक्षा निमित्त सार्वजनिक संगितमय श्रीमद् भागवत साप्ताहाचे आयोजन जळगाव चे श्रीकृष्ण सत्संग मंडळ मार्फत दि.१२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे. कथेची वेळ दुपारी ०२ ते ०५ आहे.

ह.भ.प सुरेशजी पाठक यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे निरूपण होत असून जीवंत पणी आई वडीलांची मनसोक्त सेवा करूण पितृपक्षात पितरांच्या नावाने दान धर्म, कथा केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळून सद्गती मिळते,पितृ पक्ष पर्वणी मध्ये पितृ स्मरणार्थ जे ही सत्कर्म केले असता भगवान नारायण वैकुंठाचे द्वार पितृ साठी उघडतात त्यामुळे त्यांची मुक्ती होऊन आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते असे भागवत कथेचे निरूपण करतांना ह.भ.प सुरेशजी पाठक महाराज म्हणाले.

या कथेत आपल्या पुर्वजांना मुक्ती मिळण्यासाठी अनेक भाविक जोडप्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला असून गो शाळेच्या पवित्र ठिकाणी ही कथा सूरू आहे. दि.२० सप्टेंबर ला काल्याच्या किर्तनाने सांगता होऊन महाप्रसादाचे वाटप होईल. सदर कथेचा लाभ घेण्यासाठी अध्यक्ष मधुकर पाठक, उपाध्यक्ष नितीन पाठक व सचिव चंद्रकांत पाठक यांनी भाविकांना आवाहन केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!