गाढवानं लाथ मारायच्या आधी आम्ही लाथ मारून घालवलं; फडणवीसांच्या ‘गधाधारी’वर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : गदा पेलायला सुद्धा हातामध्ये ताकद पाहिजे. हनुमान, भीम! त्यामध्ये आपले देवेंद्र फडणवीस बोलले, अहो यांचं हिंदुत्व हे घंटाधारी नाही, गदाधारी आहे. म्हटलं बरोबर आहे. आमचं हिदुत्व हे गदाधारी होतं. पण ते अडीच वर्षांपूर्वी सोडलं. आमचं हिदुत्व हे गदाधारी होतं. पण ते अडीच वर्षांपूर्वी सोडलं. त्यामुळे आमच्यासोबत जी गाढवं होती घोड्याच्या आवेशात त्यांना आम्ही लाथ मारली. त्या गाढवांनी लाथ मारण्याआधी आम्ही त्यांना लाथ मारून बाहेर पडलो. गाढव ते गाढवच. आमचे जे काही जुने फोटो तुमच्यासोबत येत आहेत त्याने तुमचा गैरसमज झाला असेल.आम्ही अडीच वर्षांपूर्वीच गाढवाला सोडून दिलं. त्यामुळे तुम्हाला गैरसमज झाला असेल, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसह भाजप जहरी टीका केली आहे.
भाजपवर हल्लाबोल करत ते म्हणाले आहेत की, ”देशात एक भ्रम निर्माण केला जात आहे आणि आवेश आणला जात आहे, देशातच नाही तर जगभरात हिंदुत्वाचे रक्षक हे भारतीय जनता पक्ष आहे. मग जे इथे बसले आहे. ते कोण आहे. हे जे हिंदू आहेत. यांच्या धमन्यांमध्ये हिंदुत्वाचा रक्त त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी परेल आहे, हा हिंदू काही मेलेल्या आईच दुध पिलेला नाही.” हिंदुत्वाचा खोटा बुर्खा घातलेला एक पक्ष आपल्यासोबत होता ते देशाची दिशा भरकवटत आहेत,असं म्हणत उद्धव ठाकरेंनी घणाघाती भाषणाला सुरुवात केली.
मुंबईतील बिकेसी मैदानावर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेत भाजप आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘तुमच्या प्रमाणे मलाही जरा मोकळं वाटतं आहे. बऱ्याचदिवसांनी मैदानावर उतरलो आहे. मोकळा श्वास घेतो आहे. अनेक विषयांवर बोलायचं आहेच. पण आज सर्वप्रथन छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतो. छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यावर आणखी काही बोलायची गरज नाही. पण काही वेळेला ज्यांना महाराष्ट्र काय आहे हे महाराष्ट्रात राहून ओळखता आलेलं नाही त्यांच्यासाठी बोलावं लागतं.
‘मला आज मोठी गदा दिली. मी मध्ये एकदा बोललो होतो. आमचं हिंदूत्व कसं आहे ते शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. तोच धागा घेऊन आपण पुढे जात आहोत. आमचं हिंदूत्व हे गदाधारी आणि बाकीच्यांचं हिदूत्व हे गदाधारी आहे. बसा बडवत. काय मिळालं? घंटा! हे बघा तो गदा हलवतोय. हिंदुत्व हे घंटाधारी नाही, गदाधारी आहे. म्हटलं बरोबर आहे. आमचं हिदुत्व हे गदाधारी होतं. पण ते अडीच वर्षांपूर्वी सोडलं. आमचे जे काही जुने फोटो तुमच्यासोबत येत आहेत त्याने तुमचा गैरसमज झाला असेल.आम्ही अडीच वर्षांपूर्वीच गाढवाला सोडून दिलं. त्यामुळे तुम्हाला गैरसमज झाला असेल, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ”तुमचा पक्ष (स्वतंत्र चळवळीत) तर तेव्हा नव्हता, आमचाही नव्हता. मात्र तुमची मातृसंस्था जी आहे संघ. तिला दोन ते तीन वर्षात आता 100 वर्षे होतील. स्वतंत्र लढण्यात संघ एकदाही उतरला नाही, असेल तर दाखले दाखवा. तुमचा आणि स्वतंत्र चळवळीचा संबंध नाही. त्या स्वतंत्र चळवळीत तुम्ही नव्हता, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही तुम्ही नव्हता. तेव्हा शिवसेना नव्हती. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे काका श्रीकांत ठाकरे हे माझ्या आजोबाला मदत करत होते. माझे आजोबा जेव्हा हा लढा सुरू होता, त्यावेळी त्या लढ्यातले पहिले पाच सेनापती होते, त्यातले एक प्रबोधनकार ठाकरे. त्यावेळी त्यांनी जनसंघासह सर्वाना एकत्र येण्याचं आव्हान केलं होत. मात्र या चळवळीतून कोणी पाहिलं फुटलं असले, तर यांचा पक्ष जनसंघ.