भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय

भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला– एकनाथ खडसे

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : भाजप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा पक्षात जात असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. पण कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्यावर टीका केली नसून कोणीही राजीनाम्याची मागणी केली नव्हती. चौकशीचीही मागणी केली नव्हती. तुम्ही रेकॉर्ड तपासा असं विधान असेल तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेल’ असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

“मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली”, काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं खडसे म्हणाले.

गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते, त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचं काम केलं. भाजपने मला अनेक मोठी पदं दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही, असं खडसे म्हणाले. माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षाताईंनी भाजप सोडणार नाही असं सांगितलं आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत, असं खडसे म्हणाले. भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं. मला राष्ट्रवादीने कोणतंही आश्वासन दिलं नाही. मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीच सांगू शकेल. मला पदाची अपेक्षा नाही. माझ्या ताकदीने मी पदं मिळवली आहेत. सहकारातून मिळवलं आहे, असं खडसे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!