भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

मी पक्षाची कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहील– खा. रक्षाताई खडसे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र त्यांनी या सगळ्या चर्चेला पूर्णविराम देत भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, मी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देणार नाही. मी पक्षाची कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहील असं त्यांनी स्पष्ट केलं.

“आजचा दिवस अत्यंत दुखाचा आहे. बाबांनी जो निर्णय घेतला त्याचं दु:ख मलाही आहे. पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे,” असं त्या म्हणाल्या. भाजपामधून तुम्हीही बाहेर पडणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी भाजपाकडून निवडून आली आहे. लोकांनी मला भाजपा उमेदवार म्हणून निवडून दिलं आहे. मी पक्षाचं काम करणार असून पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार. नाथाभाऊंनी देखील ४० वर्ष पक्षात घालवली. पण व्यक्तिगत कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला”.

“पक्षाने दिलं हे त्यांनीही मान्य केलं आहे. पक्षासोबत त्यांचंही योगदान आहे. जेव्हा आपण व्यक्ती म्हणून काम करतो तेव्हा योगदान महत्त्वाचं असतं. नाथाभाऊंनी कधीही माझ्यावर मी सांगेन तसं करायचं असा दबाव टाकला नाही. त्यांनी संस्कार, शिकवण दिली. जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आले आणि तीच सेवा आज भाजपाच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळे माझ्यावर कोणताहाी दबाव नाही,” असं रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!