कुंभारखेडा – चिनावल सह परिसरात रस्त्यांची दुर्दशा: वाहन चालक त्रस्त
कुंभारखेडा, ता. रावेर (प्रा योगेश कोष्टी) प्रतिनिधी | कुंभारखेडा सह चिनावल परिसरातील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली असून या परीस्थितीला परिसरातील वाहनधारक त्रस्त झालेले आहेत. रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेले असून परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे त्वरित लक्ष घालून सदर समस्या सोडवावी अशी मागणी परिसरातून होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , कुंभारखेडा – चिनावल, चिनावल – वाघोदा, चिनावल – कोचुर ,कुंभारखेडा – कुंभारखेडा फाटा हे अतिशय वर्दळीचे रस्ते अतिशय दयनीय अवस्था सोसत आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या मार्गांची झालेली आहे. दररोज या मार्गाने मोठ्या प्रमाणात केळी वाहतूक होत असून भविष्यात मोठा अपघात या खड्ड्यांमुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर या रस्त्याने प्रवास करीत असताना वाहनधारकांचे अतिशय हाल होत आहे . त्यामुळे वाहनधारक अतिशय त्रस्त झाले असून लोकप्रतिनिधींनी त्वरित या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

