भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

सावदा रेशन दुकानावर निकृष्ट दर्जाची अळंब लागलेली ज्वारी वाटप, माजी नगरसेवक भानुदास भारंबेची प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार

लाभार्थ्यांच्या आरोग्याशी खेळला जातोय खेळ?

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | येथिल रेशन धान्य दुकानातून सद्यस्थितीत वाटप करण्यात येत असलेली ज्वारी अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे.  ज्वारीला अक्षरश अळंब लागलेली असून तीच ज्वारी रेशन दुकानावर लाभधारकांना वाटप केली जात असल्याची बाब समोर आल्याने माजी नगरसेवक भानुदास भारंबे यांनी प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याशी तत्काळ भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

रेशन धान्य दुकानातून अंत्योदय आणि प्राधान्य योजनेंतर्गत गहू,ज्वारी आणि तांदूळ मोफत दिले जातात. मात्र रावेर तालुक्यातील सावदा शहरातील रेशन दुकानांमध्ये सद्यस्थितीत वाटप करण्यात येत असलेली ज्वारी अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याची बाब समोर आली आहे. ज्वारीला अक्षरश अळंब लागलेला असून तीच ज्वारी रेशन दुकानावर लाभधारकांना वाटप केली जात आहे. ही ज्वारी पुरवठा विभागाकडूनच पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात रावेर पुरवठा विभागाचे विवेक शिरेकर यांच्याशी माजी नगरसेवक भानुदास भारंबे यांनी फोन करून संपर्क साधला असता तीन चार वेळा फोन करूनही त्यांनी फोन रिसिव करण्यास असमर्थथा दर्शवली.

तसेच पुरवठा विभागाचे दीपक जाधव यांच्याशी संपर्क साधला असता “वरून जसा माल ( ज्वारी,गहू, तांदूळ) आला तसाच आम्ही पाठवला” असे सांगत उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली.त्या नंतर माजी नगरसेवक भानुदास भारंबे यांनी प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराची चौकशी करतो असे आश्वासन दिले.

सावदा शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून पुरवण्यात आलेल्या धान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्यातील ज्वारी हे धान्य निकृष्ट दर्जाचे असून सर्व ज्वारी ही काळपट व पाणी लागलेली आहे. तिचा उग्र स्वरुपाचा वासही येत आहे. खाण्यास योग्य नसलेल्या त्या ज्वारीचे रेशन दुकानातून लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. निकृष्ट धान्याची वाटप करुन जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. रेशन दुकानाकडे विचारणा केली असता धान्य हे पुरवठा विभागाकडूनच तसे येत असल्याचे सांगण्यात आले, व तसे पुरवठा विभागा कडूनही “आले ते पाठविले” असे सांगण्यात आले. अनेक ज्वारीची पोते फोडून बाधितली असता सर्वच ज्वारीच्या पोत्यांमध्ये ज्वारी अळंब लागलेली अत्यंत निकृष्ट दर्जाची उग्र वास येत असलेली ज्वारी आढळून आली. गेल्या महिन्यात अशाच प्रकाराचे तांदूळ वरुनच पाठविण्यात आले होते. त्यावेळीही पुरवठा विभागाचे दीपक जाधव यांनी पुढच्या वेळेस चांगला माल पाठवू असे सांगितले होते. यासर्व प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी माजी नगरसेवक भानुदास भारंबे व सावदा वासियांकडून करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!