राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक पावसाने एन्ट्री केल्याने तारांबळ
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात ऐन हिवाळ्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. राण्यातील ठाणे,रायगड, नवी मुंबई सह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.
पेण तालुक्यातील जोहे, हमरापूर ठाण्यातील घोडबंजीदर रोड सह परिसरात पावसाने हजेरी लावल्याने विद्यार्थ्यांची सुद्धा धावपळ सुरु झाली. अचानक आलेल्या पावसाने वीटभट्ट्या, गणपती कारखाने यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.दरम्यान या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे.
