अल्पवयीन विद्यार्थिनीला पाठविला मुख्याध्यापकाने अश्लील व्हिडीओ, मुख्यध्यापकाचं भयानक कृत्य
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका शाळेतील मुख्याध्यापकाने त्याच्याच शाळेत दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ पाठवला. या प्रकरणी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाल्यानंतर या मुख्यध्यापकाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी शिक्षकाने चिठ्ठी देखील लिहिलेली आहे. ही धक्कादायक घटना आहे नांदेड जिल्ह्यातील.
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहराजवळ असलेल्या पासदगाव येथे पुष्पांजली माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांनी त्यांच्याच शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ पाठवले होते. पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना याबाबत समजलं तेव्हा त्यांनी मुख्याध्यापक कारामुंगें विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. कुटुंबियांच्या तक्रारी नुसार शिवाजीनगर पोलिसांनी गुरुवारी सुनील कारामुंगेविरोधात पोकसोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
मुख्याध्यापकाची चिठ्ठी लिहून आत्महत्या, काय लिहिलं आहे चिठ्ठीत?
मुख्याध्यापक सुनिल कारामुंगे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी विष प्राशन केले . त्यांना लागलीच दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. आत्महत्येपूर्वी सुनील कारामुंगे यांनी चिठ्ठी लिहीली असून ही चिठ्ठी पोलीसांनी जप्त केली आहे. “पीडित मुलीच्या कुटुंबीयानी माझा मानसिक छळ केला त्यामुळे आत्महत्या करत आहे,” असा उल्लेख या चिठ्ठीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र आत्महत्येपूर्वी मुध्याध्यापकांनी लिहिलेल्या या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्यांचेच आहे ना याची पडताळणी पोलिसांकडून सुरु आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी दिली आहे.
दरम्यान, मयत मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या नातेवाईकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदवली असून. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.