भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

खाजगी घरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, तिघे ताब्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा रामानंद नगर पोलिसांनी कारवाई करत पर्दाफाश केला. शहरतील न्यू स्टेट बँक कॉलनीमध्ये एका भाड्याच्या घरात सुरू होता. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून या रॅकेटचा छडा लावला. या कारवाईत पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका दाम्पत्यासह तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

रामानद नगर पालास ठाण्याच निराक्षक राजेंद्र गुंजाळ यांना न्यू स्टेट बँक कॉलनीतील एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे रामानद नगर पालास ठाण्याच निराक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी एक पोलीस पथक तयार केले. या पथकाने एक बनावट ग्राहक (डमी) तयार करून त्याला संबंधित ठिकाणी पाठवले. या डमी ग्राहकाने खात्री झाल्यावर पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा केला. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्या दोन मजली इमारतीवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणारा दिनेश संजय चौधरी (वय ३५) आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती (भारती दिनेश चौधरी) (४२, रा. देवेंद्र नगर, ह.मु न्यू स्टेट बँक कॉलनी) यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यासोबत तीन तरुणही आढळून आले, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील एका महिलेची सुटका केली आहे. हे दाम्पत्य तिला जास्त पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून बळजबरीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून रोकड आणि काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिनेश चौधरी आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती (भारती दिनेश चौधरी) यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!