“स्पा” सेंटर च्या नावाखाली देहविक्री, पोलिसांनी छापा टाकला, अन्…..
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | इतर राज्यांतून मुलींना आणून त्यांना जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असलेल्या “स्पा” सेंटर, मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. “आरंभ स्पा” सेंटरवर सुरू असलेल्या देहविक्री व्यवसाय करीत असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी २१ ऑगस्ट गुरुवार रोजी मोठी कारवाई करत पाच पीडित मुलींची सुटका करण्यात आली. ही घटना नाशिक शहरातील मुंबईनाका परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी खुशबु परेश सुराणा या महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्याविरुद्ध मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक शहरात मुंबईनाका हद्दीतील ‘आरंभ स्पा’ सेंटर या ठिकाणी मसाज पार्लरच्या आडून सुरू असलेल्या देहविक्री व्यापार करीत असलेल्या पार्लरवर छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी पाच मुलींची सुटका केली. या सर्व मुली उत्तर भारतातील विविध राज्यांमधून – कानपूर, दिल्ली, बिहार व मिझोराम येथून आणण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर नाशिकमधील एका महिलेचाही यात समावेश आहे. सदर महिलांना आर्थिक फायद्यासाठी जबरदस्तीने देहव्यापारास प्रवृत्त करण्यात आल्याचे पोलिस तपासातून समोर आले. यात मुख्य आरोपी खुशबु परेश सुराणा या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्यावर पिटा व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी खुशबु परेश सुराणा या महिले विरुद्ध याआधी देखील अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिस अधिक कठोर पावले उचलणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेश दिले होते.
सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीबी एमओबीच्या पथक, सपोनि विश्वास चव्हाणके, प्रवीण माळी, शेरखान पठाण, नामदेव सोनवणे तसेच पोलिस अंमलदार गणेश वाघ, समीर चंद्रमोरे, प्रजित ठाकूर, नीलिमा निकम, लिला सुकटे, वैशाली घरटे, हर्षल बोरसे आणि दीपक पाटील यांनी संयुक्तरीत्या पार पाडली. दरम्यान, शहरातील इतर स्पा सेंटर, मसाज पार्लरमध्ये पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. या पुढे देखील अशाच कारवाया सुरु राहणार, असा इशारा नाशिक पोलिसांकडून देण्यात आला आहे. या कारवाईने मसाज पार्लर किंवा स्पा सेंटर च्या नावाखाली देहव्यापार करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.


