भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या राज्याचं लक्ष ,सभेसाठी “या” तेरा अटी

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज ठाकरे च्या या बहुप्रतिक्षित सभेकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पुण्यातील गणेश क्रीडा मंच स्वारगेट इथे ही सभा पार पडणार आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी या सभेसाठी एकूण 13 अटी घालत सभेला सशर्त परवागनी दिली आहे.

पुण्याचे मनसे शहारध्यक्ष साईनाथ बाबर यांनी मनसेप्रमुखांच्या सभेसाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी या सभेला 13 अटी घालत परवानगी दिली.

“या” आहेत अटी
– ही जाहीर सभा दि.२२ मे रोजी सकाळी १० ते २ पर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या वेळेत आणि कार्यक्रमस्थळात बदल करु नये.
– सभेत वक्त्यांनी भाषण करताना 2 समाजामध्ये धार्मिक तसेच जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
-सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा वंश, जात, भाषा, प्रदेश, जन्मस्थान किवां ते पाळत असलेल्या रुढी पंरपरांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी.
– सभेमध्ये सामील होणारे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक यांनी स्वंयशिस्त पाळावी. तसंच सभास्थळी पोलीस पुणे १ स्टेशन, वेगवेगळ्या भागातून येताना जाताना इतर धर्म/जाती/पंथ यावर टीका टिप्पणी तसेच कार्यक्रमस्थळी हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाहीत तसेच सभेच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह, वक्तव्य, खाणाखुणा तसेच निशाणी दाखवणार नाहीत.
– कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये. तसंच प्रदर्शन करु नये. शस्त्र अधिनियमातील कायदेशीर तरतुदीचे उल्लघंन होणार नाही याची काळजी घेतील.
– अट क्रं ०२ ते ०५ याबाबत सभेत सहभागी होण्याऱ्या संबधितांना कळवण्याची आणि अटी शर्थीबाबत अवगत करण्याबाबतची जबाबदारी संयोजकाची राहिल.
-सदर कार्यक्रमास आयोजकांनी स्वंयसेवक नेमावेत व ते येणाऱ्या नागरिकांना योग्य त्या सूचना देतील तसेच त्यांचे आसनव्यवस्थेच्या ठिकाणावर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होणार नाही. तसेच क्षमतेपेक्षा जास्त लोकांना आमंत्रीत करु नये. जेणेकरुन गोधंळ, अव्यवस्था, चेंगराचेंगरी असा अनुचीत प्रकार टाळता येईल. तसा अनुचीत प्रकार घडल्यास आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल.
-सभाठिकाणी तसेच सार्वजनिक जागी लावण्यात येणारे स्वागत फलक हे रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने लागणार नाहीत याबाबत दक्षता घेण्यात यावी.
-आयोजकांनी मुख्य व्यासपीठावर उपस्थितांची संख्या नियोजित आणि निश्चीत ठेवावी. त्याबाबत वेळेत पोलीस विभागास अवगत करावं. जेणेकरुन अनपेक्षित कुणीही अनोळखी व्यक्ती व्यासपीठावर येवून कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणार नाही याबाबत काळजी घेतील.
-सभेच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेबाबत योग्य ती काळजी घेतील. तसेच सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनीक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे नियमांचे पालन करावे.
-सभेच्या ठिकाणी येणाऱ्या लोंकाची सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून फ्रिस्कींग चेंकीग करण्याचा अधिकार पोलीसांना राहिल त्यामध्ये कोणताही व्यत्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
-सदर कार्यक्रमादरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. अॅब्युलन्स, दवाखाना, बस सेवा, दळणवळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
-सभेच्या ठिकाणी येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरीक, लहान मुले यांचे आसनव्यवस्थेबाबत योग्य ती काळजी घ्यावी. त्यांना स्वतंत्र आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी इ. आवश्यक सुविधा मिळतील याबाबत प्रयत्न करतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!