‘स्पा’च्या नावाखाली खुलेआम वेश्याव्यवसाय, चार तरुणींची सुटका
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l फोनिक्स ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला. पोलिसांनी पिंपरी-चिंचवडमध्ये निगडीतील फोनिक्स ‘स्पा’वर छापा टाकून स्पा महिला मॅनेजरला ताब्यात घेतले असून येथून चार तरुणींची सुटका केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निगडीमध्ये इन्स्पिरिया मॉलमध्ये फोनिक्स नावाने सुरू असलेल्या ‘स्पा’मध्ये तरुणींना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.
पोलिसांनी या फोनिक्स ‘स्पा’मध्ये डमी ग्राहक पाठवून तिथं वेश्याव्यवसाय केला जातो का? याची शहानिशा केली. यानंतर ‘स्पा’वर छापा टाकून येथून चार तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. महिला मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून फरार आरोपी दिनेश गुप्ताचा पोलिस शोध घेत आहेत.