भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

पुणे, प्रतिनिधी: येथे घरगुती आयुर्वेदिक मसाज सेंटच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा पर्दापाश भारती विद्यापीठ पोलिसांनी केला असून एका तरुणीकडून हा व्यवसाय करून घेत असल्याचे स्पष्ट झाल्याने याप्रकरणी एका 50 वर्षाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील संतोषनगर परिसरात एक महिला घरामध्ये तरुणींकडून आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती याप्रकरणाचा छळा लावण्यासाठी पोलिसांनी सापळा टाकत बनावट ग्राहकाला पाठविला त्यानंतर तेथे सदरील महिला पालघर येथील एका २२ वर्षाच्या तरुणीकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे आढळून आल्याने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्यादिवरून पोलिसांनी या महिलेला अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर अधिक तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!