घड्याळ कोणाला मिळणार? राष्ट्रवादी कुणाची? आजच्या सुनावणीत नेमकं काय घडल?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून यावर आज सुनावणी होणार होती, ऐन निवडणुकीत होणाऱ्या या निवडणुकीडे राज्याचं लक्ष लागल होतं, मात्र कोर्टाचं कामकाज आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे यावर सुनावणी होऊ शकली नाही. आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हबाबतचं प्रकरण प्रकरण लिस्ट मध्ये ४४ नंबरला होत. मात्र आज कोर्टाचं काम हे १६ व्या प्रकरणापर्यंतचं चालल्याने हे प्रकरण बोर्डावर आलचं नाही. आता कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. त्यामुळे या सुट्ट्या संपल्यानंतरच प्रकरणावर सुनावणी होणार आहे. म्हणजे जुलै च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या प्रकरणाची सुनावणी लांबली आहे.
राष्ट्रावादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने एकतर्फी अजित पवार यांना दिलं आहे, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने याचिकेत म्हलटं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत अजित पवार यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशा जाहिराती देण्याचे निर्देश दिले होते. .न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार होती. दरम्यान ऐन निवडणुकीत सुनावणी होणार होती त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. आता जुलै महिन्यात कोर्ट यावर काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.