भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

अन्नसुरक्षा योजनेत गरजूंना सामावून घ्यावे व रेशन दुकान ज्या त्या विभागात करावे, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा राजेश वानखेडे यांचा इशारा

सावदा, ता. रावेर मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शहरातील अन्न सुरक्षा योजनेत गरजू कुटुंबियांना सामावून घ्यावे व रेशन दुकान ज्या त्या निर्धारित विभागात मूळ करण्याचे आदी प्रश्नांबाबत त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, नगरसेविका रेखा वानखेडे, सिमरन वानखेडे व नगरसेवकांनी रावेर तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदन म्हंटले आहे की, शासन नियमानुसार अन्नसुरक्षा योजना रेशनिंग विभागामार्फत गेल्या २०१४ पासून निरंतर सुरु आहे. यात गरिब, गरजू, पीडित, शोषित कुंटुंबीयांना लाभ मिळणे अपेक्षीत धोरणांकीत आहेत, परंतू सावदा शहरात या योजने अंतर्गत मोठा घोळ व नियम बाह्य बाबी आढळून येत असून खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित असून त्याना आपल्या हक्कापासून वंचीत राहावे लागत आहेत. तर अनेक पीडित, शोषित, वंचित कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तसेच या योजनेच्या वितरणप्रणालीमध्ये काही दोष आठवून येतात यात प्रामुख्याने, या योजनेत समाविष्ट होण्यासाठी प्राधान्य १२ अंकी क्रमांक प्राप्त होवूनही त्यांना लाभ न मिळता दुकान चालकाकडून सतत नकार व चालढकल केली जाते. उडवाउडवीची उत्तरे देवून लाभार्थ्यांचा पाणउतारा केला जोतो. शासन निर्णयनुसार ज्या- त्या विभागासाठीचे शासनमान्य धान्य दुकान हे त्या विभागात कार्यरत असणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता दुकान पूर्वेला तर लाभार्थी ग्राहक पश्चिमेला अश्या चुकीच्या जाचक व त्रासदायक पल्ला व रचना या दुकानाची आहे. त्यामुळे लाभार्थीना अश्या समस्याना सामोरे जावे लागत असून नाहक पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेऊन सर्व दुकाने आपापल्या निर्धारीत विभागात मूळ करण्याचे आदेश जारी व्हावेत तसेच सर्व दुकानाचे दप्तर तपासणी नियमित केली जावी व पुरवठा अधिकारी तथा स्वत तहसीलदार यांची अचानक भेट करण्यात येवून चौकशी व्हावी. असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच आमच्या मागण्याचा विचार करण्यात येऊन तत्काळ न्याय द्यावा अन्यथा एक मोठे जनआंदोलन लढा पुकारला जाईल व सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील असा इशारा राष्ट्रवादीचे गटनेते व नगरसेवक राजेश वानखेडे यांच्याकडून देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!