भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावशैक्षणिकसामाजिक

नात्याच्या जपणुकीसह पर्यावरणाचं रक्षण करणारी राखी – उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे

पर्यावरण पूरक राखी बनवण्याची कार्यशाळा

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l मानव सेवा मंडळ, संचलित प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव येथे पर्यावरण पूरक राखी बनवण्याची कार्यशाळेत कागदापासून राखी बनवण्याचा आनंद वेगळाच असतो. या उपक्रमात तयार केलेली राखी वृक्षाला बाधुन त्याला आपला भाऊ समजून आपण सर्वांनी वृक्षाचे रक्षण केले पाहिजे. तर वृक्ष वाचतील व पर्यावरणाचा हास रोखला जाऊ शकतो .या उपक्रमातून वृक्ष संवर्धन संदेश दिला आहे. पर्यावरण पुरक राखी व वृक्ष यांचे महत्व जाणून घेत त्याची पर्यावरणाशी सांगड घालण्याघा प्रयत्न या इको क्लब अंतर्गत या उपक्रमा व्दारे केला जात असल्याचे उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी सांगितले.

या वेळी दाभाडे यांनी प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम पाहता पर्यावरण पुरक राखी तयार करुन यासाठी जनजागृती करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यशाळेत पर्यावरण पुरक राखी कशी तयार करायची याविषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी कागदापासून अतिशय सहजरीत्या वेगवेगळ्या आकाराचे राखी बनवण्यास शिकवले .विविध आकाराचे राखी बनवून विद्यार्थ्यांनी स्वनिर्मितीचा आनंद घेतला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी 201 पर्यावरण पुरक राखी बनवून पर्यावरण संवर्धनाचा शाळेचा मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी विद्यार्थ्यांकडून संकल्प करुन घेतला.

उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी कौतुक केले. या कार्यशाळेसाठी बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील शाळेतील शिक्षक हर्षा चौधरी ,मिरा चौधरी, मनोजकुमार बावस्कर, योगिता घोलाणे, मनिषा तायडे ,प्राजक्ता बिरारी,भारती मॅडम, शिंदे मॅडम व कर्मचारी दिनेश बाविस्कर, विकास चौधरी इत्यादी नी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!