राज्यासह देशभरात राम मंदिरं सजली ; मोठ्या उत्साहात साजरा केला जातोयं श्री राम जन्मोत्सव
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे रामनवमी. हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा उत्सव आज रविवार, 6 एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
रामनवमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून देशभरात साजरा केला जातो. चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतानुसार, या दिवशी अयोध्येच्या राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या घरी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णू यांचा अवतार असून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात.
रामनवमीच्या दिवशी दिवशी घरी पूजा आणि यज्ञ केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीही प्रसन्न होते. माता सीतेला देवी लक्ष्मीचे स्वरुप मानले जाते. भगवान रामासोबत सीतेची उपासना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात ऐश्वर्य वाढते, अशी मान्यता आहे.
अयोध्या येथे रामजन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो त्या निमित्ताने देशभरातून भाविक लाखोच्या संख्येने अयोध्येत पाहायला मिळत आहे.
राज्यभरात शहरात गाव खेड्यात ठिकठिकाणी रामनवमी उत्सव साजरे केले जात असून भजन,कीर्तन, प्रवचन, रामरक्षा स्तोत्र पठण असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले असून शोभायात्रा काढल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वत्र राम मंदिरांसह हनुमान मंदिर अशी अनेक मंदिरांची सजावट केली गेली असून भक्तिमय वातावरणात सर्वत्र राम नवमी उत्सव साजरा केला जात आहे.
देशभरात रामनवमी आज रविवारी साजरी केली जात आहे. हा सण हिंदू कालगणनेनुसार वर्षातील पहिला महिना असणाऱ्या चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी (नवमी) येतो. अयोध्येत ८ दिवस जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे.
अयोध्येत ८ दिवस होणार कार्यक्रम
रामजन्मभूमी अशी ओळख असलेल्या अयोध्येत भगवान रामाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ८ दिवस चालणाऱ्या उत्सव कार्यक्रमात भाविकांना त्रेतायुगासारखा अनुभव येणार आहे. शेवटच्या दिवशी, रविवारी, दुपारी १२ वाजता, राम मंदिरासह सर्व ५००० मंदिरांमध्ये ‘प्रकात्य आरती’ एकाच वेळी केली जाईल. संपूर्ण शहर शंख आणि घंटांच्या आवाजानं त्यावेळी दुमदुमून जाणार आहे. या काळात, श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी १ किलोमीटर रेड कार्पेट टाकण्यात येणार आहे. यावर्षी रामनवमीच्या दिवशी २० लाखांहून अधिक रामभक्त अयोध्येत पोहोचतील असा अंदाज आहे.
ड्रोनचा वापर करून नदीचं पाणी शिंपडण्यात येणार -भव्य राम मंदिरात भगवान श्री रामलला यांचा जन्मोत्सव दुसऱ्यांदा साजरी करण्यात येत आहे. रामनवमीला येणाऱ्या रामभक्तांवर ड्रोनचा वापर करून पवित्र शरयू नदीचं पाणी शिंपडले जाईल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा