अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी, गुन्हा दाखल !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : एका तरूणाला अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून १७ हजाराची ऑनलाईन फसवणूक करून पुन्हा पैश्यांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
- यावल तालुक्यात अमोल जावळे याना उस्फुर्त प्रतिसाद, सर्वसामान्यांकडून महायुती सरकारच्या निर्णयांचे कौतुक
- US Election 2024 Live Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
- ब्रेकिंग : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; दोन फरार !
एका ३१ वर्षीय तरुणाला रा. कासोदा ता. एरंडोल येथील फेब्रुवारी २०२१ ते ८ जून २०२२ दरम्यान, अनोळखी नंबरवरून अश्लिल मॅसेज व अर्धनग्न पाठवून चॅटींग करण्यात आले. तरूणाच्या मोबाईलवर खून केलेले, रक्तबांबाळ असलेले व्हिडीओ पाठवून तुझा देखील खून करून मृत्यू घडवेल अशी धमकी दिली. या धमकीला घाबरून तरूणाने दिलेल्या फोन पे नंबरवरून २ हजार आणि १५ हजार असे एकुणन १७ हजार रूपये पाठविले.
पैसे दिल्यानंतर समोरील अज्ञात व्यक्तीने पुन्हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या धमकीला कंटाळून तरूणाने थेट दि. ९ जून रोजी दुपारी २.३० वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.