रावेर

काँग्रेस तालुकाध्यक्ष व जिल्हा सचिव अनुसूचित जाती विभागाच्या नियुक्त्या राजू सवर्णे यांच्याकडून जाहीर !

रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगांव जिल्हा काँग्रेस अनुसुचित जाती विभाग तालुका  व जिल्हा सचिव पदाच्या नियुक्त्या काँग्रेस अनु.जाती विभाग जिल्हा कार्याध्यक्ष  राजू सवर्णे यांनी जाहीर केले आहे.

  आयु.दीपक दयाराम महासे रा.चिनावल ता.रावेर जि.जळगाव याची रावेर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचे काम गतिमान करणेसाठी रावेर तालुका काँग्रेस अनु.जाती विभाग तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करणेत आली आहे.

तसेच आयु.ईश्वर भागवत अटकाळे, रा.थेरोळा, ता.रावेर, जि.जळगांव याची जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभाग
जिल्हा सचिव या पदावर नियुक्ती करणेत  आली आहे काँग्रेस पक्षाचे काम गतिमान करणेसाठी प्रामाणिकपणे हि जबाबदारी स्विकारुन पक्ष संघटन मजबूत करावे  असे  नियुक्ती पत्र काँग्रेस अनु.जाती विभाग जिल्हा कार्याध्यक्ष राजू सवर्णे यांनी दिले आहे.सदर नियुक्ती पत्र रावेर तालुक्याचे आमदार शिरीष दादा चौधरी याचे हस्ते देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!