भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मभुमी ” महू ” बचाव यासाठी भिमज्योत मशाल यात्रा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर/खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। ” महु ” मध्यप्रदेश येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभुमी स्मारकाचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती स्थापन करून स्मारकाचे व्यवस्थापन सोपवल्याने संघ परिवाराचा कब्जा केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने स्मारक वाचविण्यासाठी पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेला ‘ दि.15 फेबुवारी पासुन पुणे येथुन अहमदनगर , औरंगाबाद जळगाव .,, भुसावळ , सावदा , रावेर येथुन मध्यप्रदेशातील बुरहानपुर येथे रवाना झाली .

संयुक्त संविधान बचाव कृती समिती , भीम जन्मभुमी बचाव कृती समिती, इनक्रेडिबल समाजसेवक गृप च्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .या भिम ज्योत मशाल यात्रेचे नेतृत्व असलम बागवान हे करीत आहे . दि.19 फेब्रुवारी पासुन महू येथे अहिंसक मार्गाने बेमुदत सत्याग्रहास सुरुवात होईल मागणी मान्य होई पर्यंत सुरु राहील मध्य प्रदेश सरकारने महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे व्यवस्थापन करणारी डॉ. बाबासाहेब मेमोरियल सोसायटी ही 1972 साली स्थापीत मुळ संस्था बाजुला करून नवी स्मारक समिती स्थापन करून त्यात संघ विचाराचे सदस्य घुसविण्यात आले आहेत . असंवैधानिक पद्धतीने ही समिती तयार केली असुन डॉ आंबेडकर जन्मभुमीवर कब्जा मिळविणे हे त्यांचे उदिष्ट आहे या विरोधात भारत भर आंदयोलन करण्यात येणार असुन ही यात्रा त्याचाच एक भाग आहे . नव्याने स्थापन केलेली समिती रद्द करावी अशी ही मागणी करण्यात आली .
ज्या बाबासाहेब आबेडकर यांनी संविधान करून कायदयाची परिभाषा तयार केली त्यांच्याच स्मारकाचे संचालन करणारी समिती असंवैधानिक ही संतापजनक बाब आहे . विविध पक्ष सामाजिक संघटना याबाबत कल्पना देऊन स्मारक समिती वाचविण्याचे आंदोलन मोठे करण्यात येणार आहे डॉ. आंबेडकर यांचा विचार दाबण्याचा हा प्रयत्न केला जात आहे असा आरोप यावेळी करण्यात आला .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!