महिलेसह तीन जणांवर विळ्याने प्राणघातक हल्ला, एक जण ताब्यात !
रावेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : तालुक्यातील कर्जोद येथे तरुणी घरात एकटी असतांना घरात घुसलेल्या एकास जाब विचारल्याने रागातून महिलेसह तिघांवर विळ्याने वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी एकास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
- धक्कादायक : ४३ जन्म मृत्यू दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या, बनावट जन्मदाखले तयार करून नागरिकत्व मिळवण्याचं बांगलादेशी कनेक्शन?
- मुलीला रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवत १३ लाखांची फसवणूक ! जळगाव मध्ये गुन्हा दाखल
- मुलीला रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवत १३ लाखांची फसवणूक ! जळगाव मध्ये गुन्हा दाखल
तालुक्यातील कर्जोद येथील ज्योत्स्ना राजकुमार ससाणे ही तरूणी बुधवार १ जून रोजी तरूणी एकटी घरात असतांना त्याच गावात राहणारा अनिल रमेश ससाणे (वय-२९) हा घरात घुसला होता. अनिल घरात आल्याचे पाहून तरूणीने त्याला शिवीगाळ करून हाकलून दिले. याचा राग असल्याने अनिल ससाणे याने लोखंडी विळ्याने वार करून तरूणीला जखमी केले व जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी घरातील रमाबाई रविंद्र सासणे आणि गौतम गिरधर ससाणे हे आवरण्यासाठी आले आसता त्यांना देखील जखमी केले आहे.
सदरील हल्लयात तीन जण जखमी झाले असून यातील महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अनिल रमेश ससाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.