भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

केळी पीक विम्याचे लाखों रुपये हडप करणाऱ्यांची नावे लवकरच समोर येणार…!

सावदा ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क| रावेर तालुक्यातील पीक विम्याची कोट्यवधींची रक्कम दुसऱ्याच्या नावावरील शेती उताऱ्याला बोगस कागदपत्रे जोडून हळपल्याची एकएक नावे आता समोर यायला लागली आहेत.

दुसऱ्यांच्या शेती उताऱ्याला बनावट कागदपत्रे तयार करून त्यात शेतकऱ्यांच्या नावाने स्टॅम्प घेऊन त्यावर शेतकऱ्याची बोगस सही करून, तसेच विम्यास लागणारे अनेक कागदपत्रे तयार करून पीक विम्याची कोट्यवधी रुपयांची रक्कम हळप केली. यात काही तलाठी,स्टॅम्प वेंडर ,कृषी खात्याशी संबंधित काही अधिकारी, विमा कंपनीचे एजंट,ऑनलाइन काम करणारी यंत्रणा,काही विमा कंपनीशी संपर्कात असणारे मध्यस्थी दलाल
कोण आहेत हे लवकरच समोर येणार आहे.

केळी पीक विम्याची कोट्यवधी रुपयांची रक्कम रावेर तालुक्यातील कोचुर परिसरातल्या एका मोठ्या कुटुंबातील बऱ्याच लोकांच्या नावे काढण्यात आली आहेत. त्यात शेतकऱ्यांच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून महिलांच्या नावाने सुद्धा मोठमोठ्या रक्कम हडप केल्या आहेत. त्याच प्रमाणे कुंभारखेडा, जानोरी, चीचाटी, जिन्सी, आभोडा येथील शेतीवर सुद्धा केळी पीक विम्याची लाखो रुपये हडपण्यात आली असून यासह वडगाव, चिनावल, फैजपूर येथील शेतकऱ्यांच्या कोचुर शिवारात असलेल्या शेतीवरील शेत उताऱ्याला बोगस कागदपत्रे जोडून लाखो रुपये केळी पीक विम्याच्या नावाखाली लाखों रूपये हडपणाऱ्या ……को, ……ल. वर्तुळातील गटाबाबत मोठा घोटाळा उघडकीस येणार असल्याचे परिसरात बोलले जात आहे.

पीक विम्याचा मंजूर यादीत शेतकऱ्यांना आपल्या नावावर केळी पिक विमा मंजूर झाल्याचे समजल्याने तालुक्यात मोठा कोट्यावधी रुपयाचा केळी पीक विमा घोटाळा झाल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात असल्यामुळे कायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी संबंधित काही मध्यस्थी दलालांनी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर केळी पिक विमा काढून घेतला आहे त्या शेतकऱ्यांनी तक्रारी करू नये व घोटाळा उघडकीस न येता कारवाईस सामोरे जावे लागू नये म्हणून मध्यस्थी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना काही ठराविक रकमा देऊन समन्वय साधून गप्प बसवीत आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष केळी लागवड असताना त्यांना केळी पीक विमा मिळाला नाही अश्या शेतकऱ्यांची तक्रारी वाढल्यास तालुक्यात केळी पिक विमा योजनेअंतर्गत मोठा घोटाळा उघडकीस येणार आहे.

रावेर तालुक्यात अनेक गावांत अनेक ठिकाणी बोगस कागद पत्रे तयार करून पिकविम्याचे मोठ्याप्रमाणावर रकमा हडप केल्या आहेत, कोणी कोणी केळी पीक विम्याचे लाखो रुपये हडप केले याची नवनवीन माहिती समोर येत आहे, लवकरच त्यांची नावे समोर येतील. तसेच आणखीही या बाबत अधिक माहिती व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून कोणाला केळी पीक विम्याच्या घोटाळ्या बद्दल माहिती असल्यास त्यांनी ९१७२३२५००३ या नंबरवर संपर्क साधावा आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल

काहींनी प्रत्यक्ष केळी लागवळ नसताना इतर पीक पेरणी केली असतानाही केळी पीक दाखवून पीक विम्याचा लाभ घेतला आहे ,पीक विम्याला शेतीची मर्यादा असताना वेगवेगळी नावे लावून तसेच केळी पीक विम्यासाठी शेती क्षेत्राची मर्यादा असताना मर्यादेच्या बाहेर शेती क्षेत्रावर इतरांच्या नावे लाखो रुपयांचा रक्कमा काढल्या असून यांची नावे लवकरच समोर येणार असल्याचे तालुक्यात बोलले जात असून चौकशीचा सासेमेरा लागण्याची शक्यता वाढली आहे…(क्रमश.)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!